Pune: रेल्वेकडून प्रवाशांना दुसऱ्यांदा दणका; पुन्हा छुपी भाडेवाढ?

Indian Railway
Indian RailwayTendernama

पुणे (Pune) : रेल्वेने आरक्षित तिकीटावरील (Reserved Tickets) प्रवाशांना आता दुसऱ्यांदा झटका दिला आहे. यापूर्वी आरक्षित तिकीटावरील सवलती रद्द केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ‘करंट चार्ट’मधील (अंतिम यादी Current Chart) प्रवाशांना मूळ तिकीटाच्या रकमेवर देण्यात येणाऱ्या १० टक्क्याची सवलत रद्द केली आहे. त्यामुळे पुण्याहून सुटणाऱ्या तब्बल १०७ रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. रेल्वे मंत्रालय तिकीट दरात थेट दरवाढ करू शकत नसले तरी या मार्गातून मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करीत आहे.

Indian Railway
Pune: पुण्यातील 'ही' 2 मेट्रो स्थानके आहेत खास; महिना अखेरीस...

रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसह अन्य घटकांना तिकीट दरात दिलेली सवलत कोविडच्या काळात रद्द केली. आता ती पुन्हा सुरू केले जाणार नाही. तसेच ज्या प्रवाशांना करंट चार्टमध्ये आरक्षित तिकीट मिळते, त्या प्रवाशांना तिकीट दरात सवलत दिली जात होती. ही सवलत १० टक्के इतकी होती. तीदेखील दोन दिवसांपासून बंद करण्यात आली. पुण्यासह देशभर त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली असून, आरक्षण प्रणालीत तो पर्याय हटविण्यात आला आहे.

Indian Railway
MSRTC: राज्याची जीवनवाहिनी पुन्हा 'टॉप गिअर'मध्ये धावणार; कारण...

करंट चार्ट म्हणजे काय?

मुख्य चार्ट बनल्यानंतर त्यात जर काही सीट उपलब्ध असतील, तर रेल्वे सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी करंट चार्ट तयार केला जातो. ही सुविधा केवळ प्रवास सुरू करणाऱ्या आरंभीच्या स्थानकावरच्या गाड्यांना व मुख्य स्थानकावरून धावणाऱ्या काही मोजक्याच रेल्वेगाड्यांना लागू आहे. सरसकट अन्य रेल्वेचा यात समावेश नाही.

Indian Railway
Devendra Fadnavis : 250 'ई-बस'साठी लवकरच निधी देणार

करंट बुकिंगमध्ये प्रवाशांना १० टक्के सवलत मिळत होती. यामुळे शिल्लक राहिलेले सीटदेखील भरायचे. रेल्वेने यापूर्वीच आरक्षित तिकीटावरील सवलती रद्द केल्या आहेत. यात ही सवलतदेखील रद्द झाल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होईल. रेल्वे प्रशासनाने ही सवलत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी.

- पीयूष संगापूरकर, प्रवासी

Indian Railway
Nashik : घराचा प्रकार आणि ठिकाणावरून होणार घरपट्टीची आकारणी

करंट चार्ट लागू असणाऱ्या गाड्या ः १०७

पुण्यातून सुटणाऱ्या गाड्या ः २५०

दररोजचे प्रवासी ः १ लाख ५० हजार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com