Pune : पुणेकरांच्या स्वप्नावर एअर इंडियाने फिरवले पाणी; कारण...

Pune Airport
Pune AirportTendernama

पुणे (Pune) : पुणे-मुंबईदरम्यान विमानसेवा (Pune To Mumbai Flight) सुरू होण्यासाठी पुणे विमानतळ (Pune Airport) प्रशासनाने प्रयत्न केले खरे; मात्र, त्याला विमान कंपनीचा काहीच प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे एअर इंडियाला (Air India) दिलेला स्लॉट विमानतळ प्रशासनाने रद्द केला. आता एअर इंडियाने समर शेड्यूलमध्ये सकारात्मकता दर्शवली तर स्लॉट देण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे प्रवाशांना पुणे-मुंबई विमानसेवेसाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

Pune Airport
Airport : 14 वर्षे झाली; यवतमाळवासीयांचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

पुणे-मुंबईदरम्यान बंद झालेली विमानसेवा सुरू होण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासन प्रयत्न करीत आहे. जानेवारीत पुणे व मुंबई विमानतळांवर एअर इंडियाला सकाळच्या सत्रातील स्लॉट उपलब्ध करून दिला होता. त्या कालावधीत त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद लाभला नाही. त्या स्लॉटचा वापर झाला नाही. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने १५ दिवसानंतर स्लॉट रद्द केला. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हा स्लॉट ठरविला होता. मात्र, त्याला प्रतिसाद लाभला नाही. ही विमानसेवा सुरू झाली; तर पुण्याहून मुंबई अवघ्या २५ मिनिटांत गाठणे शक्य होईल.

Pune Airport
Aurangabad : उकीरडा लपवण्यासाठी तब्बल 17 लाखांचे टेंडर

पहिली सेवा ‘एअर इंडिया’ची
२००८ मध्ये पुणे-मुंबई-दिल्ली अशी दररोज विमानसेवा सुरू होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर २०१७ मध्ये जेट एअरवेज पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, तीदेखील सेवा काही कारणामुळे बंद झाली.

विमानसेवेचा फायदा काय?
१. अवघ्या २५ मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत
२. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहनांच्या संख्येत काही प्रमाणात घट होईल
३. मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाने पुढचा प्रवास करणे सोपे जाईल
४. कार्गो सेवेलादेखील चालना मिळेल

Pune Airport
Sambhajinagar: सिडकोने फसवले, पालिका ऐकेना अन् पाणी मिळेना

पुणे-मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी एअर इंडियाला स्लॉट दिला होता. मात्र, त्याला काहीच प्रतिसाद लाभला नसल्याने तो अखेर रद्द केला. एअर इंडियाने पुन्हा स्लॉटची मागणी केल्यास त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com