Pune : पुणेकरांनो सावधान! 'ती' चूक आता चांगलीच महागात पडणार?

Pune
PuneTendernama

पुणे (Pune) : पुणेकरांनो, कचरा हा कचरा पेटीतच टाका. शहरात सार्वजनिक ठिकाणी, पुलावरून कचऱ्याने भरलेल्या पिशव्या भिरकावल्या तर तुम्हाला दंड झालाच म्हणून समजा, असा सज्जड इशारा पुणे महापालिकेने (PMC) दिला आहे.

Pune
Nashik : मजूरसंस्था, सुशिक्षित बेरोजगार यांना विनाटेंडर 15 लाखांची कामे मिळणार?

देशात इंदूरसारखी शहरे स्वच्छतेबाबत पहिला क्रमांक घेतात. मात्र दहा हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पुणे महापालिकेला अपयश येते. हे चित्र आता बदलण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा महापालिकेने उगारला आहे. त्यामुळे शहरात वाटेल तिथे कचरा टाकाल तर दंड केला जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

नदीमध्ये किंवा पुलावरून, रस्त्याचा एखादा कोपरा पाहून, धार्मिक स्थळाचा परिसर, भाजी मंडई, उद्यान, बसथांबा किंवा कोणत्याही स्वरूपाचे सार्वजनिक ठिकाण दिसताच कचऱ्याने भरलेल्या पिशव्या रिकाम्या केल्या जातात. काही जण तर कचऱ्याच्या पिशव्या हवेतून भिरकावून देतात. या सगळ्यांवर त्याच वेळी दंडात्मक कारवाई करण्याचा पवित्रा आता प्रशासनाने घेतला आहे.

Pune
काँग्रेसच्या दोन आमदारांचा टक्केवारीचा वाद प्रदेशाध्यक्षांकडे; 35 कोटींच्या निधीसाठी घेतले...

कचऱ्यातून निर्माण होणारा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कचऱ्याचा दूरगामी परिणाम जैवविविधतेवर, नदीच्या आरोग्यावर होत असल्याचे ठळकपणे मांडले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे.

२६ हजार जणांकडून दंड वसूल

- महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या, अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान प्रत्येक महिन्यात १२०० ते १३०० जणांवर कारवाई झाली.

- ऑक्टोबरपासून महापालिकेने बेशिस्त नागरिकांवरील कारवाई अधिक कडक केली. ऑक्टोबर २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ या साडेचार महिन्यांत घनकचरा व्यवस्थापन विभागाने २६ हजार ४७५ नागरिकांवर कारवाई केली.

- त्यांच्याकडून ७५ लाख २५ हजार ५२८ रुपये इतका दंड वसूल केला आहे.

Pune
Malegaon : मालेगाव महापालिकेचे घंटागाडीचे 75 कोटींचे टेंडर का सापडले वादात?

काही बेजबाबदार नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता केली जाते. तरीही अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई अधिक कडक केली आहे. प्रत्येक नागरिकाने आपले शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

आपण घर स्वच्छ ठेवण्याकडे कधी दुर्लक्ष करत नाही, मग शहरदेखील स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. काही नागरिकांमुळे शहरात अस्वच्छता निर्माण होत असेल, तर त्यांनीही आपल्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे.

- विजय काळोखे, नोकरदार.

Pune
Sambhajinagar : वाळूजजवळील 'या' 18 खेड्यांचा 32 वर्षांनंतर होणार कायापालट

...म्हणून पडला ‘आरोग्य’च्या कामात ‘प्रकाश’

महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील इंदूर शहराला भेट दिली होती. पुणे महापालिकेच्या तुलनेत इंदूरसारख्या छोट्या महापालिकेत असणारी कमालीची स्वच्छता, तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक कष्ट, योगदानही अधिकाऱ्यांनी पाहिले. त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी पुण्यातही स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे ठरवून कंबर कसली. त्यानुसार आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

अशी झाली कारवाई

महिना (२०२३) .............. दंड झालेल्यांची संख्या .............. दंडाची रक्कम

जानेवारी ......................... १३५७ ......................... ४ लाख ३३ हजार ५६०

फेब्रुवारी ......................... १४५५ ......................... ४ लाख ८६ हजार ९२०

मार्च ......................... १३४१ ......................... ३ लाख ९५ हजार १० रुपये

एप्रिल ......................... १०६४ ......................... ३ लाख १२ हजार ९६०

मे ......................... १२५८ ......................... ५ लाख ८६ हजार ९२०

जून ......................... १३१८ ......................... ४ लाख ३६ हजार ३००

जुलै ......................... १३३२ ......................... ५ लाख ८७ हजार ४३०

ऑगस्ट ......................... ११५० ......................... ३ लाख ९५ हजार २००

सप्टेंबर ......................... १२१४ ......................... ४ लाख ५३ हजार १०

ऑक्टोंबर ......................... ५९३३ ......................... १७ लाख १५ हजार २००

नोव्हेंबर ......................... ४२९९ ......................... १२ लाख १० हजार ३४०

डिसेंबर ......................... ८४०८ ......................... २६ लाख ३३ हजार ४४८

महिना (२०२४)

जानेवारी .........................५८८६ ......................... १७ लाख ९८ हजार २५०

१५ फेब्रुवारी ........... १९४९ ......................... १ लाख ६८ हजार २९०

एकूण .........................७८३५ ......................... १९ लाख ६६ हजार ५४०

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com