Pune: राजकीय हस्तक्षेपाची पुणेकरांना 'अशी' मोजावी लागणार किंमत?

PMC Pune
PMC PuneTendernama

पुणे (Pune) : राजकीय हस्तक्षेप आणि मर्जीतील ठेकेदाराला (Contractor) काम मिळवून देण्यासाठी केलेल्या दबावतंत्रामुळे पथ विभागाला टेंडर (Tender) रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे मध्यवर्ती पेठा, कोथरूड, बावधन, विमाननगर, धानोरी, कात्रज-कोंढवा, फुरसुंगी, धायरी यांसह इतर भागातील रस्त्यांची कामे मंजूर करण्यास तीन महिने उशीर झाला आहे.

PMC Pune
Pune: महापालिकेत समाविष्ट होऊन आम्हाला काय मिळाले?

त्याचा फटका पुणेकरांना बसणार असून, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका प्रशासनाने १११ कोटी १६ लाख रुपयांच्या दोन टेंडर स्थायी समितीमध्ये मंजूर केल्या आहेत. त्यातून ४१ किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरीकरण केले जाणार आहेत.

गेल्यावर्षी खड्ड्यांचा त्रास
शहरातील सर्वच भागात समान पाणी पुरवठा योजना, पावसाळी गटारे, सांडपाणी गटारे, मोबाईल केबल, विद्युत वाहिनी टाकण्यासह विविध कारणांनी खोदकाम केले होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात पुणेकरांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. परिणामी, काही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले होते. पण, पुणेकरांना चांगले रस्ते कधी मिळणार, असा प्रश्‍न कायम होता.

त्यातच शहरात होणाऱ्या G-20 परिषदेमुळे रस्त्यांचे कामे हाती घेतले जातील, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात विमानतळ ते सेनापती बापट हा रस्ताच सुशोभित करण्यात आला.

PMC Pune
ठाणे क्लस्टर 10 तुकड्यात प्रत्येकी 17 एकरात राबवा: जितेंद्र आव्हाड

पाच पॅकेजमध्ये रस्त्यांची विभागणी
शहरातील रस्ते डांबरीकरण करणे, समपातळीमध्ये आणण्यासाठी ३०० कोटी रुपयांच्या टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये पाच पॅकेजमध्ये शहरातील रस्त्यांची विभागणी केली आहे. पॅकेज एक हे सिमेंट काँक्रिटीकरणाचे आहेत तर उर्वरित चार पॅकेज हे रस्ते डांबरीकरणाचे आहेत. पहिल्या टप्प्यात तीन पॅकेजमध्ये ५० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १९३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. पण याची कामे अतिशय संथ गतीने सुरू होते. नंतर कामाला गती आली असून, आता सुमारे ३० किलोमीटरची कामे झाली आहेत.

पॅकेज चारसाठी राबविलेल्या टेंडरमध्ये मे. डी. जी. बेल्हेकर ॲण्ड कंपनीची सर्वात कमी खर्चाची ५६ कोटी ६७ लाख ७६ हजार रुपयांचे टेंडर मान्य केले. तर पॅकेज पाचमधील कामासाठी मे. श्री. असोसिएटस यांची ५४ कोटी ४९ लाख ७७ हजार रुपयांचे टेंडर स्थायी समितीने मान्य केले.

चौथे पॅकेज ठरले होते वादग्रस्त
रस्ता डांबरीकरणाच्या पॅकेज चारसाठी माजी नगरसेवक, माजी सभागृहनेते, विद्यमान आमदारांनी आपल्याच ठेकेदाराला काम मिळाले पाहिजे, यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरवात केली. खोटी कागदपत्र जोडणे, डांबराचा प्लांट शहराच्या हद्दीबाहेर असणे यांसह इतर अटींचे उल्लंघन केले जात असल्याने वाद निर्माण झाला होता.

अखेर हे टेंडर प्रशासनाने रद्द केले. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता, त्यानंतर राबविलेल्या टेंडर प्रक्रियेमुळे वेळ गेला. त्याचा फटका २९ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामांना बसला.

PMC Pune
Pune शहरातील 'हे' लोन जिल्ह्यातही पसरतेय; सुरक्षेचे काय?

पॅकेज चारमधील प्रमख रस्ते
- हांडेवाडी रस्ता
- एनआयबीएम चौक ते पॅलेस आॅर्चिड
- कौसरबाग रस्ता
- काळेपडळ गजानन महाराज मंदिर रस्ता
- फुरसुंगी ते खुटवड चौक
- आंबेगाव येथील दरी पुलाजवळील रस्ता पावसाळी गटारांसह
- आंबेगाव खुर्दमधील रस्ता पावसाळी गटारांसह
- कात्रज
- वडगाव खुर्द, वडगाव बुद्रूक, धायरीतील अंतर्गत रस्ते
- कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते
- वानवडीतील सनग्रेस शाळा
- कोंढवा-मिठानगर येथील रस्ते

पॅकेज पाचमधील प्रमख रस्ते
- गरवारे महाविद्यालय ते कर्वे पुतळा
- राहुलनगर रस्ता, जलसंपत्ती भवन ते गोसावी वस्ती
- वारजे महामार्गालगतचे रस्ते
- बालेवाडी रस्ता
- भांडारकर रस्ता
- भांडारकर, प्रभात रस्त्यावरील अंतर्गत रस्ते
- डेक्कन जिमखाना
- धानोरी गावठाण
- सोकोरेनगर
- विमाननगर
- सर्किट हाऊस
- सावित्री निवास, साई एन्टरप्रायझेस बावधन
- शिवाजी पुतळा ते भेलकेनगर चौक

PMC Pune
Nashik ZP:वित्त आयोगाचे 1 कोटी चुकीच्या पद्धतीने खर्च करण्याला चाप

शहरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी पॅकेज चार आणि पाचचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला होता. त्यास मान्यता देण्यात आली आहे. यामाध्यामातून ४१ रस्त्यांची कामे होतील.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com