Pune : पुणे महापालिकेचा फोकस आता 'या' कामांवर; 3 कोटींचा खर्च

PMC
PMCTendernama

पुणे (Pune) : महापालिकेने शहरातील १४ क्रीडा संकुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यामध्ये १२ जलतरण तलावांचा समावेश आहे.

PMC
सरकारी पदे कंत्राटी तर आमदार, खासदारही कंत्राटी का नाही?; कोणी केला सवाल?

महापालिकेने शहरात ३७ जलतरण तलाव बांधले आहेत. त्यापैकी ३१ सुरू असून सहामध्ये मोठ्याप्रमाणात दुरुस्तीची कामे असल्याने ते बंद आहेत. दिवाळीनंतर जलतरण तलावांमध्ये नागरिकांची पोहण्यासाठी गर्दी वाढते. त्यामुळे त्यापूर्वी किरकोळ दुरुस्त्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये मोटार बंद पडणे, जलतरण तलावातून पाणी गळती होणे, टाइल्स निघणे यांसह इतर कामांचा समावेश आहे.

प्रत्येक जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉलमध्ये ५० लाखांच्या आतील कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असली तरी हा खर्च एक कोटी रुपयांनी वाढणार असल्याने तीन कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे.

PMC
Tanaji Sawant : मंत्री डॉ. तानाजी सावंतांची पाचही बोटे तुपात! काय आहे कारण?

याठिकाणी होणार दुरुस्ती

शिवाजीनगर जलतरण तलाव व व्यायामशाळा, स्वातंत्र्यवीर सावरकर तलाव- कौसरबाग, पिराजी कोयाजी डांगमाळी जलतरण तलाव- हडपसर, बारटक्के जलतरण तलाव- वारजे, छत्रपती शाहू महाराज तलाव- सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव- वारजे, वांजळे जलतरण तलाव- वडगाव, खराडी जलतरण तलाव, कै. निळू फुले जलतरण तलाव- घोरपडी पेठ, कर्वेनगर बॅडमिंटन हॉल, कै. शिवाजीराव ढुमे क्रीडा संकुल- पर्वती, कै. बापूसाहेब केदारी जलतरण तलाव- वानवडी, गाडगीळ शाळेच्या आवारातील जलतरण तलाव- शनिवार पेठ आणि कै. ना. ग. नांदे जलतरण तलाव बालगंधर्वशेजारी.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com