Pune : 'या' महत्त्वाच्या विस्तारित मेट्रो मार्गाबद्दल PMRDA ने घेतला मोठा निर्णय

Pune Metro
Pune MetroTendernama

पुणे (Pune) : शिवाजीनगर ते लोणी काळभोर दरम्यानचा विस्तारित मेट्रो प्रकल्प खासगी भागीदारी तत्त्वावर (PPP) की ठेकेदाराची (Contractor) नेमणूक करून (EPC) याचा निर्णय घेण्यासाठी ‘आर्थिक तांत्रिक सल्लागार’ नेमण्याची प्रक्रिया पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए - PMRDA) सुरू केली आहे. सल्लागाराकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.

Pune Metro
Nashik : 56 कोटींच्या रेल्वे चाक निर्मिती कारखान्याची यशस्वी चाचणी

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली यावर निर्णय घेण्यासाठी ‘पुमटा’ची (पुणे युनिफाइड अर्बन ट्रान्स्पोर्ट ॲथॉरिटी) बैठक झाली. बैठकीला पुलगेट ते हडपसर दरम्यान आठ किलोमीटर मार्गाचा तांत्रिक व आर्थिक अहवाल ‘पीएमआरडीए’ आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे तयार करावा. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कोणाचा प्रकल्प व्यवहार्य आहे. त्यावर कोणी त्या मार्गाचे काम करावे, यावर निर्णय घेण्यात यावा, असे ठरले होते.

त्यानुसार शिवाजीनगर ते लोणी काळभोर दरम्यान मेट्रोचे विस्तारीकरण कोणत्या पद्धतीने करणे योग्य होईल, याबाबत निर्णय घेण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने ‘आर्थिक तांत्रिक सल्लागार’ नेमावा, अशी सूचना ‘पुमटा’ने केली. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (‘डीपीआर’) यापूर्वीच ‘पीएमआरडीए’ने केला आहे. आता या मार्गाचा ‘आर्थिक तांत्रिक सल्लागार’ नेमण्याची टेंडर प्रक्रिया ‘पीएमआरडीए’कडून सुरू केली आहे.

Pune Metro
Nagpur : नागपूर शहरापासून 80 किमीवर उभे राहतेय एक नवे आश्चर्य! लवकरच उद्घाटन

अशी आहे स्थिती...

- हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’कडून हाती

- पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यानचे काम महामेट्रोकडे

- खडकवासला ते खराडी २८ किलोमीटर मार्ग महामेट्रोकडून प्रस्तावित

- ‘पीएमआरडीए’चा विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर पुलगेट, हडपसर आणि लोणी काळभोर, तर एक फाटा सासवड रोडवर

- महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी

- या दोन्ही मार्गावर पुलगेट ते हडसपर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग एकत्रित (कॉमन) असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्‍न निर्माण झाला

Pune Metro
Nashik : कामे अपूर्ण असूनही Smart City विरोधात 60 कोटींचा दावा

कोणाचे काय म्हणणे?

माण या ठिकाणी मेट्रोसाठी कार डेपो आहे. तसेच लोणी काळभोर या ठिकाणीदेखील कार डेपोसाठी आरक्षण आहे. त्यामुळे पुलगेट ते हडपसर या मेट्रो मार्गाचे काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ‘पीएमआरडीए’ची आहे. तर खडकवासला येथे मेट्रोसाठी कारडेपो करण्यात येणार आहे, त्यामुळे पुलगेट ते हडपसर या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम आम्ही करतो, असे महामेट्रोचे म्हणणे आहे.

प्रस्तावित मार्ग

- खडकवासला- स्वारगेट-पुलगेट- हडपसर फाटा (मगरपट्टा सिटी) ते खराडी हा सुमारे २८ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग महामेट्रेाकडून प्रस्तावित

- शिवाजीनगर-पुलगेट-हडपसर ते लोणी काळभोर हा १९ किलोमीटर मेट्रो मार्ग ‘पीएमआरडीए’कडून प्रस्तावित

Pune Metro
CIDCO : सिडकोच्या कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी का फोडला टाहो?

शिवाजीनगर ते लोणी काळभोर हा मेट्रो मार्ग ‘पीपीपी’ अथवा ‘ईपीसी’ तत्त्वावर राबविणे योग्य होईल, याचा निर्णय घेण्यासाठी ‘आर्थिक तांत्रिक सल्लागार’ नेमण्याच्या सूचना ‘पुमटा’ने प्राधिकरणाला दिल्या आहेत. त्यानुसार सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया ‘पीएमआरडीए’ने सुरू केली आहे.

- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, मेट्रो प्रकल्प ‘पीएमआरडीए’

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com