Pune : बालगंधर्व रंगमंदिरातील पार्किंगची समस्या सुटणार; कारण...

Balgandharva Rangamandir
Balgandharva RangamandirTendernama

पुणे (Pune) : बालगंधर्व रंगमंदिरात येणाऱ्या प्रेक्षकांची पार्किंगसाठी होणारी दमछाक आता थांबण्याची चिन्हे आहेत. कारण, महापालिकेने पार्किंगमध्ये बदल केल्याने मोटारी व दुचाकी वाहने लावण्याची क्षमता काही प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर मोटारींना बाहेर पडण्यासाठी वर्तुळाकार व्यवस्था केल्याने कोंडीची समस्याही सुटण्याची शक्‍यता आहे.

Balgandharva Rangamandir
Nagpur : नवीन नागपूरचा जानेवारीत फुटणार नारळ? 750 कोटींच्या कामांचा 'असा' आहे प्लॅन

बालगंधर्व रंगमंदिरामध्ये नाटक, विविध कार्यक्रम, प्रदर्शन पाहण्यासाठी दररोज येणाऱ्या हजारो प्रेक्षकांना वाहने लावताना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा नाटक, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी किंवा सुटल्यानंतरही रंगमंदिराच्या परिसरात वाहनांची कोंडी होते. मोठी कसरत करून वाहने बाहेर काढावी लागतात. रंगमंदिराच्या आवारातून अनेकदा बाहेर पडण्याच्या गेटमधूनच वाहने आतमध्ये प्रवेश करत असल्याने त्यावरूनही प्रेक्षक व सुरक्षारक्षकांमध्ये वाद होतात.

जागेच्या अभावामुळे प्रेक्षकांवर अनेकदा वाहने मुख्य रस्त्यालगत लावावी लागतात. त्याबाबत प्रेक्षक, कलाकार, नाट्यव्यवस्थापकांनी महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन पार्किंग व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार, पार्किंगमधील कामे पूर्ण केली आहेत.

Balgandharva Rangamandir
Nashik : कळसुबाई शिखरावर जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! रोप-वेला सरकरची मंजुरी

काय केली व्यवस्था

१) रंगमंदिराच्या आवारातील मोटार पार्किंग परिसरातून नांदे जलतरण तलावासमोरील भिंत पाडून तेथून रंगमंदिराला वळसा घालून वर्तुळाकार मार्गाने प्रदर्शनाच्या ठिकाणाहून वाहनांना बाहेर पडण्याची व्यवस्था

२) कॅफेटेरिया बंद करून तेथेही वाहने लावण्याची व्यवस्था

३) नाटक कंपन्यांच्या बस, कलाकारांच्या वाहनांच्या पार्किंगच्या ठिकाणी डांबरीकरण करून तेथेही व्यवस्था

४) दुचाकी पार्किंगमधून रंगमंदिराच्या बाहेर पडण्याच्या गेटजवळील राडारोडा, जुन्या वस्तू काढून दुचाकींना बाहेर पडण्याचा रस्ता पूर्ववत

५) रंगमंदिराच्या पार्किंगमध्ये १०० दुचाकी व ९० मोटारी लावण्याची क्षमता आहे. या बदलामुळे आणखी ५० दुचाकी व २५ मोटारींची पार्किंग व्यवस्था

Balgandharva Rangamandir
Nagpur Metro: नागपुरात मेट्रोची धाव आता 83 किलोमीटर पर्यंत! 6 हजार 708 कोटींची तरतूद

बालगंधर्व रंगमंदिरातील वाहनतळाचे काम केले आहे. विविध बदलांमुळे वाहने लावण्याची अडचण सुटणार आहे.

- डॉ. चेतना केरूरे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, महापालिका.

महापालिकेने पार्किंग व्यवस्थेत काही प्रमाणात बदल केला आहे. त्यामुळे वाहनांची समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्‍यता आहे. कॅफेटेरिया बंद करून पाठीमागील बाजूलाही पार्किंग केल्याने जास्त वाहने लावता येतील.

- मोहन कुलकर्णी, नाट्य संयोजक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com