Pune : फक्त 2 किलोमीटर रस्त्याचे काम 5 वर्षांतही पूर्ण होईना; PMRDA ला झालेय तरी काय?

PMRDA
PMRDATendernama

पुणे (Pune) : मांजरी येथील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या कामातील अडथळे दूर करण्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. सुमारे पाच वर्षे होऊनही केवळ दीड-दोन किलोमीटरच्या या रस्त्याचे काम अडखळतच सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना येथून धोकादायकपणे प्रवास करावा लागत असून, येथील सुलभ प्रवासासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

PMRDA
Mumbai : 'त्या' प्रसिद्ध जेट्टीचा लवकरच कायापालट! 88 कोटींतून राज्य सरकारचा 'असा' आहे प्लॅन

येथील रेल्वे उड्डाणपूल ते मुळा मुठा नदीपर्यंतच्या सुमारे दीड-दोन किलोमीटरच्या रस्त्याचे ‘पीएमआरडी’कडून पाच वर्षांपूर्वी रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम पहिल्यापासूनच संथगतीने सुरू आहे. त्यातच रस्त्यात येणारे झोपडपट्टीवासीयांचे अतिक्रमण, विद्युत रोहित्र, तसेच खांबांचे रखडलेले स्थलांतरामुळे जागोजागी रस्त्याच्या कामाला ‘खो’ बसला आहे.

ठेकेदाराची मनमानी व ‘पीएमआरडीए’ प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे रस्त्याला कोणी वालीच नसल्याचे चित्र वारंवार निर्माण होत आहे. प्रशासनातील विविध विभागांचा समन्वय नसल्याने जागोजागी काम अर्धवट व निकृष्ट स्वरूपाचे होत आहे. कामात सलगता नसल्यामुळे ते दर्जाहीन होत आहे. निकृष्ट कामामुळे दुभाजक वारंवार तुटत आहेत. काँक्रिटीकरणाच्या दोन सांध्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत. वाहतुकीला कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करणारे फलक व सिग्नल नाहीत.

PMRDA
Nashik : झिरवळ यांनी का बोलावली मंगळवारी मंत्रालयात बैठक? काय आहे तक्रार?

कामाच्या अथवा धोक्याच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षितता नाही. ठेकेदार वारंवार बदलले जात आहेत. अधिकाऱ्यांकडून कामाची गुणवत्ता तपासणी होत नाही. कामाच्या पूर्ततेबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता प्रत्येक वेळी ‘लवकरच काम पूर्ण होईल, अतिक्रमणे हलविली जातील, विद्युत रोहित्र व खांबांचे स्थलांतर होत आहे, सुरक्षेची काळजी घेतली जाईल,’ अशी ठेवणीतील उत्तरे दिली जात आहेत.

अपघाताचे वाढले प्रमाण

‘गेली काही वर्षे सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना दररोज कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविले जात नाहीत. राडारोडा जागेवरच राहतो. सिमेंटच्या वाहिन्या, दुभाजकाचे सुटे भाग ठिकठिकाणी पडले आहेत. काम झालेल्या रस्त्यावर खडे, माती पसरली आहे. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. अधिकारी व ठेकेदार कधी येतात जातात; त्याचा पत्ता लागत नाही,’ अशी तक्रार संदीप घुले, राजेंद्र तरवडे, अनिता साळुंखे, पद्मा सराटे, शुभम घुले आदी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

PMRDA
PWD : संपाच्या इशाऱ्यानंतर ठेकेदारांच्या देयकांसाठी 1200 कोटी मंजूर?

रस्त्यात येणारी अतिक्रमणे काढली आहेत. विद्युत रोहित्र व खांब स्थलांतराचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरात रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल.

- विजय कांडगावे, कार्यकारी अभियंता, ‘पीएमआरडीए’

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com