
पुणे (Pune) : पुणेकरांसाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी खास दिवाळी भेट दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यातील वाहतूक आणखी सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडून जिल्ह्यातील दोन मोठ्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.
पुणे शहरात 35 हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात दोन रस्ते प्रकल्प येणार आहेत. यामध्ये रस्ते उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो अशा ट्रिपल योजनेला मंजुरी मिळाली आहे. तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यान नव्या महामार्गाची देखील घोषणा करण्यात आली आहे.