Pune News : 'त्या' मागणीवर Ajit Pawar काय निर्णय घेणार?

Ajit Pawar
Ajit PawarTendernama

पुणे (Pune) : उन्हाळ्यात खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. (Ajit Pawar News Update)

Ajit Pawar
Nagpur : उमरेड मार्गावर साडेबारा एकरात 85 कोटी खर्चून साकारतोय 'हा' प्रकल्प

सध्या ९.४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असला तरी जुलैपर्यंत पुण्यासाठी सव्वापाच टीएमसी पाण्याची गरज आहे. बाष्पीभवनामुळे सुमारे दीड टीएमसी पाणी कमी होणार आहे. भविष्यात पुण्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने शहरासाठी ७.५ टीएमसी पाणी राखीव ठेवावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाने पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Ajit Pawar
Nashik : राज्यातील  रोजगार हमी मजुरांचे थकलेले 480 कोटी रुपये अखेर केंद्र सरकारकडून जमा

पुणे शहरासाठी दरमहा १.६ टीएमसी पाणी लागते. ३१ जुलैपर्यंत सुमारे ५.२५ टीएमसी पाण्याची गरज आहे. उन्हाळ्याचा कडाका बघता पुढील तीन महिन्यांत किमान सव्वा ते दीड टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होऊ शकते. जून महिन्यात वारीसाठी किमान अर्धा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. याशिवाय मे महिन्यात दौंडसह इतर गावांना पिण्यासाठी दीड टीएमसीचे आवर्तन सोडावे लागेल.

Ajit Pawar
Nashik : नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस; 'हा' आहे मुहूर्त

महापालिका दरवर्षी सांडपाणी शुद्ध करते. शेतीसाठी अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही. निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणीकपात सुरू होईल, अशी भीती लोकांना वाटते. त्यामुळे शहरासाठी पाणी राखून ठेवण्याचा आदेश जलसंपदा विभागाला द्यावा, अशी मागणी पवार यांच्याकडे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com