Pune News : लोकेश चंद्र म्हणाले अन् 'महावितरण'ने मनावर घेतले!

MSEB, Mahavitaran
MSEB, MahavitaranTendernama

Pune News पुणे : पहिल्या टप्प्यात स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे. महावितरणची १८ कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील ३२३ सदनिका अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात वीज ग्राहकांना वीजमीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

MSEB, Mahavitaran
Nashik News : मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या 'या' नदीजोड प्रकल्पाबाबत आली मोठी बातमी; लवकरच...

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना केली होती. त्यानुसार विविध शहरात स्मार्ट मीटर बसविण्यात आले. यामध्ये महावितरणची कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.

महावितरणच्या वीज ग्राहकांना देण्यात येणारे स्मार्ट मीटर हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे वापरलेल्या विजेची अचूक नोंद होईल. तसेच वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर नियमितपणे आपला वीजवापर समजेल.

सध्या सर्वत्र वापरात असलेल्या पारंपरिक मीटरच्याबाबतीत चुकीचे रीडिंग होणे, वेळेवर रीडिंग झालेले नसणे, चुकीची बिले येणे, अशा काही समस्या जाणवतात. मोठा वीजवापर झाल्यानंतर बिल मिळाले की, अचानक ग्राहकाला आपल्या वीजवापराबद्दल समजते आणि धक्का बसतो. अत्यंत पारदर्शी पद्धतीने अचूक बिलिंग हे स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या बिलांविषयीच्या तक्रारींचे संपूर्ण निराकरण होईल, असे मीटर वापरणे काळाची गरज झाली आहे.

MSEB, Mahavitaran
सरकारचा मोठा निर्णय; 'एक राज्य- एक गणवेश'साठी निघाले 126 कोटींचे टेंडर

वीज ग्राहकांना मोफत ‘मीटर’

केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता प्रत्यक्ष मीटर बसविण्यात येत आहेत. वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहेत. तसेच संबंधित कंपन्यांवर या मीटरची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याचे बंधन आहे.

‘या’ शहरात स्मार्ट मीटर...

नागपूर - ६०

गोंदिया - १४६

वर्धा - ३०

भंडारा - १०

चंद्रपूर - ९५

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com