Pune News : कमी मुद्रांक शुल्क भरलेल्यांसाठी चांगली बातमी! सवलतीसाठी करता येणार 31 ऑगस्टपर्यंत अर्ज

Stamp
StampTendernama

Pune News पुणे : राज्य सरकारने १९८० ते २०२० या कालवधीत दस्तनोंदणीवर कमी मुद्रांक शुल्क भरलेल्यांसाठी आणलेल्या दुसऱ्या टप्प्यातील ‘अभय योजने’ला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांना सवलतीसाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत पुणे शहरात या योजनेंतर्गत चार हजारांहून अधिक नागरिकांनी अर्ज केले आहेत.

Stamp
Sambhajinagar : अखेर काय आहे शिवाजीनगर भुयारी मार्गाची सद्य:स्थिती; जाणून घ्या अधिकारी काय म्हणाले?

१९८० ते २०२० या कालवधीत सदनिका घेतली असेल. परंतु मुद्रांक शुल्क कमी भरले असेल, अथवा १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्री करारनामा केला, मात्र रजिस्टर करण्यासाठी दाखल केले नाही, अथवा बाजारभाव विचारात न घेता दस्तामध्ये दाखविलेल्या रकमेवरच मुद्रांक शुल्क भरले असेल, अशा नागरिकांसाठी राज्य सरकारने ‘अभय’ योजना जाहीर केली आहे.

त्यामध्ये १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीसाठी एक आणि १ जानेवारी २००१ ते २०२० या कालावधीतील दस्तांसाठी असे दोन गट तयार करण्यात आले आहेत. १ डिसेंबर २०२३ पासून ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अशा दोन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे.

या योजनेत राज्य सरकारकडून सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील योजनेला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात आली. आता दुसऱ्या टप्प्यातील योजना सुरू आहे.

Stamp
Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'त्या' 4,657 कोटींमुळे मुंबई मेट्रो-3 ला मोठा बूस्टर

या योजनेत अर्ज करण्यासाठी एक महिन्याची म्हणजे ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र त्यामध्ये वाढ करीत राज्य सरकारने अर्ज करण्यास मुदत ३० जूनपर्यंत दिली होती. ती मुदत संपण्यास काही दिवस शिल्लक राहिले असताना नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे, असे सह जिल्हानिबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या योजनेची अंमलबजावणी राज्यभरात सुरू केली आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या दस्तासाठी सह जिल्हा निबंधक कार्यालयात अर्ज करता येतील. शिवाय नोंदणीसाठी सादर केलेल्या दस्तांबाबत त्या त्या सब रजिस्टर कार्यालयात अर्ज करता येतील. तर पिंपरी-चिंचवडमध्ये दापोडी येथील सिद्धी टॉवर, ए विंग, पहिला मजल्यावरील हवेली क्रमांक १७ आणि २५ येथे विशेष कक्षात अर्ज करता येणार आहे.

Stamp
उद्योगमंत्री सामंतांनी डांबरात भ्रष्टाचार करून सरकारचे तोंड केले काळे; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

अशी आहे दुसऱ्या टप्प्यातील अभय योजना

१९८० ते २००० आणि २००१- २०२० या कालावधीतील दस्तांसाठी दुसऱ्या टप्प्यात मुद्रांक शुल्कावर शंभर टक्क्यांऐवजी पन्नास ५० टक्के सवलत मिळणार आहे. तर या कालावधीतील दस्तांवर असलेल्या दंडात २० टक्केच सवलत मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील योजनेत शंभर टक्के सवलत होती. ती आता दुसऱ्या टप्प्यात कमी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com