Sambhajinagar : अखेर काय आहे शिवाजीनगर भुयारी मार्गाची सद्य:स्थिती; जाणून घ्या अधिकारी काय म्हणाले?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : बहुचर्चित व बहु प्रलंबित शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.‌ शिवाजीनगर चौकात पाण्याच्या पाइपलाइनसाठी मजीप्राकडून २० दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. यामुळे रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.‌ मजीप्रा नियुक्त कंत्राटदार जीव्हीपीआरने येथील कामात मोठा हलगर्जीपणा चालवल्याने प्रशासन हतबल झालेले आहे. यासंदर्भात जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडे विचारणा केली असता महापालिकेची जुनी जलवाहिनी आणि ड्रेनेज लाइन असल्याने तसेच महावितरण कंपनीच्या विविध प्रकारच्या केबल असल्याने खोदकाम खूप काळजी पूर्वक करावे लागत आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

Sambhajinagar
Sambhajinagar : एकनाथ नगरातील धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाकडे म्हाडाचा कानाडोळा; जबाबदार कोण?

मात्र जीव्हीपीरच्या कंत्राटदाराकडून २० दिवसांपासून काम थांबल्याने आमच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने आम्ही शिवाजीनगर ते वाणी मंगल कार्यालयाकडील रस्त्याचे काम थांबवले व शिवाजीनगर रेल्वे गेट ते देवळाई चौकाच्या दिशेने जोड रस्त्यासाठी खोदकाम सुरू केल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्याचा रस्त्याचा पृष्ठभाग काढून टाकणे आणि जमिनीवर योग्य उताराचा दर्जा तयार करणे ही कामे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.जवळपास या दिशेने खोदकाम पूर्ण होत आले आहे .रेल्वेने सुरूवातीपासून युध्दपातळीवर काम सुरू ठेवल्याने बाॅक्सच्या बाजूच्या कल्व्हर्ट पुलासाठी उत्खनन आणि स्टील बेंडिंगचे काम सुरू आहे.देवळाई चौकाच्या बाजूने १४ मीटर लांबीचा तसेच शिवाजी नगरच्या बाजूने‌ ५ मीटरचा बॉक्स पूल करण्यात येत आहे. त्यानंतर रेल्वे ट्रॅकच्या बाजूने पावसाच्या पाण्यासाठी ड्रेनेज लाइन टाकण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. येत्या दोन महिन्यांत पूलाचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही रेल्व अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान नागरिकांनी सहकार्याची भुमिका ठेवावी, अशी भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील देवळाई चौकातील वीज तारांच्या पाइपलाइनचे क्रॉसिंग सुरू केले आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : आमदार, खासदार निधीतील रस्ते धोकादायक; का भडकले महापालिका प्रशासक?

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या बांधकामाला १५ ऑक्टोबर २०२३ रोजी मुहूर्त लागला आहे. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूलाच्या बांधकामाची डेडलाईन आहे.‌ भुयारी मार्गाचे काम चालु असतानाच खोदकामात महानगरपालिकेच्या भूमिगत ड्रेनेज लाइनने रेल्वे प्रशासनाला नाकीनऊ आणले. दरम्यान ड्रेनेज लाइन शिफ्क करण्यासाठी महानगरपालिकेने निधी नसल्याचे म्हणत हात वर केल्याने हे काम अंदाजपत्रकात नसताना ऐनवेळी रेल्वे प्रशासनाला करावे लागले. यात तीन महिन्यांचा कालावधी लोटला. दुसरीकडे बांधकाम विभागाने रस्त्यांसाठी खोदकाम सुरू करताच पुन्हा महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाइनमुळे अडथळा निर्माण झाला. बांधकाम विभागाच्या टेंडरममध्ये ड्रेनेजलाईनच्य कामाचा समावेश नसल्याने महानगरपालिकेकडे महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर काम झाले पण हे काम निकृष्ट केल्याने ड्रेनेज लाइन फुटली. दरम्यान बांधकाम विभागालाच पाणी उपसण्यासाठी व दुरूस्तीसाठी महापालिकेला मदत करावी लागली.

Sambhajinagar
Sambhajinagar : एकनाथ नगरातील म्हाडावासीयांचे गृहनिर्माण मंत्र्यांना साकडे; बघा कोण काय म्हणाले?

अनेक संकटाच्या सामन्यातून अखेर येत्या दोन महिन्यांत पुलाचे काम पूर्ण होणार असल्याने गेल्या वर्षभरापासून शिवाजीनगर गेट बंद होऊन भुयारी मार्गातून नागरिकांना जाता यावे, यासाठी बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासन युध्दपातळीवर काम करत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम रखडले होते. वेगाने वाढलेल्या देवळाई-साताऱ्यातील नागरिकांना रोज या ठिकाणी रेल्वे गेट ओलांडून जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. रेल्वे आल्यानंतर गेट बंद झाल्यावर येथे वाहतूकीची मोठी कोंडी होत होती. वारंवार मागणीनंतर एक वर्षापुर्वी तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जून रोजी विशेष भूसंपादन विभागाला शिवाजीनगर रेल्वे गेट भुयारी मार्गासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात भुयारी मार्गात अडथळा ठरणाऱ्या मालमत्तांच्या मुल्यांकनांसाठी सरकारने मंजुरी दिली होती. त्यानंतर जागतिक बँक प्रकल्प विभागाकडून काम सुरू करण्या संदर्भाने पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर वाहतूक विभागाने पाहणी करुन गेट क्रमांक ५५ ची वाहतूक १५ ऑक्टोबर २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करत , मोठी वाहतूक कोंडी सोसत रेल्वे, बांधकाम व शहर वाहतूक शाखेला मोठे सहकार्य केले, अजून दोन महिने नागरिकांनी संयम ठेवावा, अशी माफक अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com