आठवडाभरच पाऊस, काय ते रस्ते अन् खड्डे ठेकेदाराचं काम एकदम 'ओक्केच'

Potholes
PotholesTendernama

पुणे (Pune) : आठवडाभरापासून संततधार पावसामुळे अवघ्या चार-पाच महिन्यांपूर्वी केलेले रस्ते उखडण्यास सुरवात झाली आहे. निकृष्ट कामाचे परिणाम करदात्या पुणेकरांनाच भोगावे लागत असून, हादरे बसून कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. समान पातळी नसल्याने रस्‍त्यात जमा होणाऱ्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यातच रस्त्यांवर पसरलेल्या खडीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

Potholes
मुंबई-हावडा थर्ड रेल्वे लाईनचा विस्तार; 'या' नदीवर उभारणार 5 पूल

शहरात वर्षभरापासून रस्ते खोदाई सुरू आहे. पाणी पुरवठा, मलः निसारण विभागाच्या कामासाठी रस्ता खोदल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्त केले गेले. मोबाईल, इंटरनेट कंपन्यांच्या केबल, विद्युत वाहिन्या टाकल्यानंतर महापालिकेने रस्त्यावर डांबरीकरण केले. पण, ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते पूर्ववत करा, असे आदेश दिल्यानंतर रस्ते दुरुस्त केले. मात्र, त्यावर लगेच खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे एकाच बाजूने डांबरीकरण करणे, डांबरीकरण करताना पाणी वाहून जाण्याची व्यवस्था न करणे यामुळे प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये पाणी साचत आहे. पावसाळी गटारांच्या बाजूने चढ असल्याने त्यातून पाणी वाहून जाऊ शकत नाही, अशी चुकीच्या पद्धतीने कामे करण्यात आली. त्यामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक सोसायट्यांच्या गेटसमोरच तळे साचत असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Potholes
पुणे जिल्ह्यातील प्रॉपर्टी कार्डमुळे भूमी अभिलेखला 'एवढा' महसूल

शहरातील प्रमुख रस्त्यांसह चौकांमध्येही मोठमोठे खड्डे पडले आहेत. चेंबरच्या बाजूने, गतीरोधकांवरही खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्याच त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांची तारांबळ उडत आहे.

समाविष्ट गावांमधील स्थिती भीषण

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील रस्त्यांची स्थिती भीषण झालेली आहे. तेथील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडणे, चिखल होण्यामुळे रस्ते धोकादायक झाले आहेत.

नक्की काय अडचणी

- खोदाईनंतर दुरुस्त केलेले रस्ते खचले

- रस्‍ते समपातळीत नसल्याने पाणी साचण्याचे प्रमाण मोठे

- खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ

- खड्डे बुजविण्याचे काम मंदगतीने सुरू

Potholes
एसटीत 5 हजार कंत्राटी चालकांच्या भरतीला सुरवात; टेंडर निघाले

पुनावालांनी करून दाखवलं

एकीकडे शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेने अंदाजपत्रकात ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद केली आहे. मात्र, महापालिकेने गेल्या आठवड्यात फक्त १०० खड्डे बुजविले तर आदर पुनावाला फाउंडेशनने तब्बल ४०० खड्डे बुजवून पुणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शहरातील खड्ड्यांना पुनावालांच्या डोसची मात्रा कामाला येत आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना पहिल्याच पावसात खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडत आहे. वाहनांचा वेग मंदावल्याने कोंडीही होत आहे. नागरिकांकडून टीका होत असताना महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. पण त्याचसोबत महापालिकेच्या या कामात आदर पुनावाला फाउंडेशनकडूनही मदत केली जाते. ‘सीएसआर’च्या माध्यमातून त्यांची स्वतःची यंत्रणा वापरून खड्डे बुजविले जात आहेत. गेल्या आठवड्यात शहराच्या सर्वच भागात खड्डे पडले आहेत, पण महापालिकेच्या पथ विभागाकडे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाची स्वतंत्र यंत्रणा असतानाही संथगतीने खड्डे बुजविले जात आहेत. त्याउलट, आदर पुनावाला फाउंडेशनकडे केवळ दोन मशिन आहेत. खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडून त्यांना यादी दिली जाते, त्यानुसार ते खड्डे बुजविण्याचे काम करतात. गेल्या आठवडाभरात महापालिकेच्या मुख्य खात्याने केवळ १०० खड्डे बुजविले तर पुनावाला फाउंडेशनने ४०० खड्डे बुजविले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com