Pune : रस्ते मोकळे करण्यास खासदार मोहोळ सरसावले; कोणाचा फोन आलातरी...

Murlidhar Mohol
Murlidhar MoholTendernama

पुणे (Pune) : शहरात पादचारी मार्ग, रस्त्यांवर प्रचंड अतिक्रमण झालेले आहे. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. कारवाईदरम्यान कोणत्याही राजकीय पदाधिकारी किंवा माजी नगरसेवकाने फोन केला तरी त्यांचे ऐकू नका, रस्ते मोकळे करण्यास प्राधान्य द्या, असे आदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

Murlidhar Mohol
EXCLUSIVE : शिंदे सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत? केसरकरांच्या खात्यात कायद्याची ऐसीतैसी!

शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मोहोळ यांनी सोमवारी (ता. ८) महापालिकेत बैठक घेतली. बैठकीत काही माजी नगरसेवकांनी शहराच्या मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमधील वाहतूक कोंडीची समस्या बैठकीत मांडली. महापालिकेकडून अतिक्रमणांवर कारवाई केली जात नसल्याने रस्ते, पादचारी मार्गांवर चालण्यासाठी, पार्किंगसाठी जागा शिल्लक नाही. अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत, अशी तक्रार माजी नगरसेवकांनी केली. त्यावर मोहोळ यांनी उपरोक्त आदेश दिले. सिंहगड रस्ता उड्डाणपूल, सनसिटी कर्वेनगर नदीवरील पूल, समान पाणी पुरवठा, घोरपडी रेल्वे पूल यांसह अन्य प्रकल्पांचा आढावा त्यांनी घेतला. अरणेश्‍वर येथील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडले आहे. हे काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. त्यावर समान पाणी पुरवठा किंवा इतर प्रकल्पांचे काम ठेकेदारांकडून वेळेत पूर्ण होत नसेल, नोटीस देऊनही कामात सुधारणा होत नसेल, तर थेट काम घ्या, असा इशारा मोहोळ यांनी दिला.

Murlidhar Mohol
Pune - Sambhajinagar Highway : पुणे - छत्रपती संभाजीनगर महामार्गाबाबत एमएसआयडीसीने काय घेतला निर्णय?

महापालिकेतील २२ टेंडरची कामे न करता थेट बिले काढण्यात आली आहेत. याबाबत अद्याप कारवाई झालेली नाही, असा मुद्दा बैठकीत मांडला. त्यावर मोहोळ यांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.

इच्छुकांची गर्दी

शहरातील आमदार विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईत असताना महापालिकेत आयोजित बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघातील समस्या मांडून त्याकडे लक्ष वेधले. दरम्यान, मोहोळ यांनी सोमवारी रेल्वे, पीएमपी आणि मेट्रो प्रश्‍नांविषयी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या वेळी मोहोळ म्हणाले...

- पुण्याहून जयपूर व जोधपूरला रेल्वे तसेच पुणे-दिल्ली स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांची भेट घेणार

- पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी आणखी १७०० ते १८०० बसची आवश्यकता

- लवकरच पीएमपीच्या ताफ्यात ७७७ बस येणार असून, त्यापैकी ४०० बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे

- पुणे विमानतळाला पूर्णवेळ जनसंपर्क अधिकारी नियुक्त करणार

बोटॅनिकल गार्डनच्या जागेसाठी पाठपुरावा

मुळा-मुठा शुद्धीकरण प्रकल्पांतर्गत ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यांपैकी १० ठिकाणी काम सुरू असले तरी कृषी महाविद्यालयाच्या जागेतील बोटॅनिकल गार्डनमधील प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नाही. ‘सकाळ’ने याबाबत आज वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर मोहोळ म्हणाले, ‘‘बोटॅनिकल गार्डनची जागा महापालिकेला मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडविल्या जातील

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com