MHADA Pune
MHADA PuneTendernama

दसऱ्यानिमित्त ‘म्हाडा’कडून पुणे, पिंपरीसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील 6 हजार 194 सदनिकांची सोडत

Published on

पुणे (Pune) : दसऱ्यानिमित्त ‘म्हाडा’च्या पुणे विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए हद्द, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सहा हजार २९४ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी नागरिकांना गुरुवारी (ता. १०) दुपारपासून म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

MHADA Pune
Pune : मुळा, मुठा व राम नद्यांच्या पात्रात राडारोडा टाकून नदीपात्र बुजविण्याचे सत्र सुरुच, कारण...

म्हाडा गृहनिर्माण योजनेत ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’मध्ये दोन हजार ३४०, म्हाडाच्या विविध योजनांतील उपलब्ध सदनिका ९३, प्रधानमंत्री आवास योजनेत ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’मध्ये ४१८ सदनिका सोडतीसाठी उपलब्ध आहेत तर २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत तीन हजार ३१२ सदनिका, तर १५ टक्के सामाजिक गृहयोजनेतील १३१ सदनिकांसाठी सोडत होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाने दिली.

Tendernama
www.tendernama.com