Pune Metro : पुणे मेट्रोला 'या' मार्गावर तब्बल 36 मिनिटे का लागला ब्रेक?

Pune Metro
Pune MetroTendernama

पुणे (Pune) : मेट्रो मार्गावरील एका वीजवाहिनीतील प्रवाह खंडित झाल्यामुळे शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी सुमारे ३६ मिनिटे एका मार्गावरील मेट्रो सेवा बंद राहिली. पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (पीसीएमसी) ते शिवाजीनगर मार्गावरील पाच गाड्या त्या-त्या स्थानकांत थांबविण्यात आल्या होत्या. दुरुस्ती होईपर्यंत प्रवासी गाड्यांमध्येच बसून होते.

Pune Metro
Nashik : 'त्या' 2 महिला सरपंचांच्या मालमत्तेवर का आली टाच? ग्रामसेवकालाही दणका

पीसीएमसी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यावर गर्दीच्या वेळी दर साडेसात मिनिटाला एक मेट्रो धावत आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कासारवाडी, नाशिक फाटा (भोसरी) या स्थानकांच्या परिसरात एका तारेतील वीजप्रवाह खंडित झाला. परिणामी सर्वच गाड्यांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यावेळी मार्गावर पाच गाड्या धावत होत्या. वीज बॅकअपच्या साह्याने त्या नजीकच्या स्थानकात आणून थांबवण्यात आल्या.

सर्व दरवाजे खुले करण्यात आले. दरम्यान, तातडीने बिघाड शोधून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आणि साधारण ३६ मिनिटांच्या खोळंब्यानंतर प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू झाला.

Pune Metro
Nashik : अखेर पर्यटन विभागाची सर्व कामांवरील सरसकट स्थगिती उठली

मेट्रोचे जनसंपर्क महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे म्हणाले, ‘‘पीसीएमसी ते शिवाजीनगर दरम्यानच्या एका वाहिनीतील वीजप्रवाह खंडित झाला होता. त्या त्या स्थानकात गाड्या थांबविण्यात आल्या. प्रवाशांना सूचना दिली. तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर नियमितपणे सेवा सुरू झाली.’’

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com