Pune Metro: अवघ्या 5 वर्षांत धावणार खराडी-खडकवासला मेट्रो

नव्या मार्गाच्या कामाचा सहा महिन्यांत होणार श्रीगणेशा
Pune Metro
Pune MetroTendernama
Published on

पुणे (Pune): केंद्र सरकारने मंजूर केलेल्या खराडी- खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग दरम्यानच्या मेट्रो मार्गांचे काम सहा महिन्यांत सुरू होणार आहे. या दोन मार्गांना मंजुरी मिळाल्याने शहरातील मेट्रोचे जाळे ११० किलोमीटरपर्यंत विस्तारले जाणार आहे.

Pune Metro
नाशिक - त्र्यंबकेश्वर दरम्यान होणार 20 किमीचा दिंडी मार्ग

खराडी, हडपसर, स्वारगेट आणि खडकवासला या २५.५२ आणि नळस्टॉप, वारजे आणि माणिकबाग या ६.१२ किलोमीटरच्या मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिल्यामुळे शहरातील मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे. केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या मार्गांबाबतचे अधिकृतपत्र महामेट्रोला लवकरच मिळेल. त्यानंतर महामेट्रोबरोबर केंद्र सरकारच्या संबंधित विभागांचा करार होईल. तो झाल्यावर मेट्रोकडून दोन्ही मार्गांसाठी टेंडर जाहीर केल्या जातील.

दरम्यानच्या काळात नवीन २८ स्थानकांसाठी महामेट्रोकडून आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वाहतूक व्यवस्थापन आराखडा अंतिम झाल्यावर पुढील सहा महिन्यांत कामाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षांत या मेट्रो मार्गांवरून प्रवासी वाहतूक सुरू होईल.

Pune Metro
Adani: मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अदानी समूहाला; तब्बल सतराशे कोटींचे कंत्राट

पुणे आणि परिसरातील मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्याची त्यांनी दखल घेतली, ही आनंदाची बाब आहे. मेट्रो शहराच्या चारही बाजूंना विस्तारणार असून पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री

सिंहगड रस्त्यावरील माणिक बाग परिसरात तसेच वारजे भागातही लोकसंख्येची घनता जास्त आहे. तर पूर्वेकडील खराडी, हडपसर येथे आयटी आणि अन्य उद्योग-व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. शहराचा दक्षिण, पूर्व, पश्चिम भाग मेट्रोने जोडला जाईल. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होईल आणि पुणेकरांना दिलासा मिळेल. सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांचे आणि नव्या प्रकल्पांचे काम आता वेगाने होईल. त्यासाठीची आर्थिक तरतूदही केंद्र आणि राज्य सरकारमार्फत झाली आहे.
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Pune Metro
Dombivli: साहित्य-कलेची पंढरी आता होणार 'क्रीडानगरी'

मेट्रो प्रकल्पामध्ये महापालिकेला कोणतीही आर्थिक तरतूद करावी लागणार नाही. सर्व खर्च केंद्र सरकारमार्फत होईल. पुनर्वसनासाठीच्या खर्चाचा भार महापालिकेला उचलावा लागेल.
- दिनकर गोजारे, प्रकल्प विभाग प्रमुख, पुणे महापालिका

पुण्यातील मेट्रो मार्ग

- ३३ किलोमीटर : वनाज-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड- स्वारगेट
- २१.८ कि.मी. विस्तारीकरण : चांदणी चौक-वनाज (१.१ किमी), स्वारगेट- कात्रज (५.३ कि.मी.), पिंपरी-चिंचवड-निगडी (४.४ कि.मी.) आणि रामवाडी-विठ्ठलवाडी (वाघोली)
- २३ कि.मी. : हिंजवडी-शिवाजीनगर
- ३२ कि.मी. : खराडी-खडकवासला आणि नळस्टॉप-माणिकबाग
- एकूण : १०९.०८ कि.मी.

सद्यःस्थितीत मेट्रो...
- वनाज-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गावरील रोजची सरासरी प्रवासी वाहतूक : २ लाख १५ हजार

- रोजचे उत्पन्न : सुमारे ३५ लाख रुपये

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com