Pune : आपत्कालीन संकटाचा सामना करण्यासाठी महापालिका सक्षम आहे का?

PMC Pune
PMC PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्‍चित करून त्याची माहिती प्रशासनाला आणि महापालिकांना द्यावी. त्याप्रमाणे पूररेषेखाली येणाऱ्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी महापालिका व पाटबंधारे विभागाला दिले आहेत.

PMC Pune
Naredra Modi : मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक धावणार बुलेट ट्रेन

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर, शास्त्रज्ञ डॉ. मेधा खोले, ‘एनडीआरएफ’चे दीपक तिवारी, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), तसेच सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘आपत्कालीन परिस्थितीत दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळतील, तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. सर्व संबंधित विभागांनी नागरिकांना सोप्या भाषेत परंतु अद्ययावत माहिती देण्याची कार्यवाही करावी. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची तुकडी पुणे जिल्ह्यात असणे ही आपल्या दृष्टीने मोठी मोलाची बाब असून, वेळोवेळी त्यांच्याकडून विविध विभागांनी प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणांनी सामाजिक जाणीव ठेवून संवेदनशील राहून कामे करावे.’’

PMC Pune
MahaRERA : नवे घर घेताय मग सावध व्हा! महारेराने काय दिला गंभीर इशारा?

भीमा नदीपात्राच्या परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील, याकरिता परिसरातील राडारोडा काढण्याची कार्यवाही करावी. दौंड आणि नीरा-नरसिंगपूर येथे पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पाटबंधारे, महसूल, पोलिस आदी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

बांधकाम विभागाला दिलेल्या सूचना

सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पूल, रस्ते, पूरबाधित गावे आदींबाबतची माहिती सर्व संबंधित विभाग तसेच नागरिकांना द्यावी. पूरबाधित गावाच्या अनुषंगाने आपत्कालीन यंत्रणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व विभागांच्या समन्वयाने सज्ज ठेवावी.

PMC Pune
Nashik : जलसंपदा विभाग समायोजनाच्या नावाने दरवर्षी लपवतोय 5 कोटींची पाणीचोरी

आरोग्य विभागाने नियोजन करावे

आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून नागरिकांना तत्काळ सेवा मिळेल, याबाबत नियोजन करावे. तालुकानिहाय रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे, साधनसाहित्य तयार ठेवावे. साथीचे रोग व उपचारपद्धती आदीबाबत स्वतंत्रप्रणाली विकसित करावी. मॉन्सून काळात सर्पदंशाचे प्रमाण लक्षात घेऊन पुरेसा सर्पविष प्रतिबंधक लस साठा उपलब्ध ठेवावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले

मेट्रो व महापालिकांना दिलेल्या सूचना

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकाक्षेत्रात मेट्रो रेल्वेमार्गिकेच्या व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. नदीपात्र तसेच रस्त्याच्या बाजूस मेट्रो रेल्वेमार्गिकेच्या कामांमुळे निर्माण होणारा राडारोडा लवकरात लवकरात काढून घेण्याची कार्यवाही मेट्रोने करावी. पवना नदीपात्रातील अतिक्रमणे, राडारोडा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तत्काळ काढावा. दोन्ही महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यात पडणारी झाडे, मार्गिकेच्या बाजूला असणारा कचरा, झोपडपट्टीतील कचरा काढून घ्यावा, अशा सूचना त्यांनी महापालिकांना दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com