PWD
PWDTendernama

Pune: PWD पूल कोसळून अपघाताची वाट पाहतोय काय?

पुणे (Pune) : पुणे-पानशेत रस्त्यावरील (Pune - Panshet Road) सोनापूर (ता. हवेली) गावच्या हद्दीतील पूल खचल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून खचत असलेला हा पूल कोसळण्याच्या मार्गावर असून, या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

PWD
Nagpur : गणेश टेकडी उड्डाणपूल तोडणे सुरु;  त्या जागी होणार...

दरम्यान, सदर पुलाचे काम करण्यासाठी टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच कामाला सुरवात होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खानापूर ते पानशेत दरम्यान रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत सोनापूर गावच्या हद्दीतील पुलावर पन्नास ते साठ मीटर लांब रस्त्याला भेग पडलेली दिसून आली.

PWD
अजित पवार अर्थमंत्री होताच पुणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, काय?..

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ भेग बुजवून घेण्यात आली. मागील वर्षी पावसाळ्यात या पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग दीड ते दोन फूट खाली खचला. सध्याही सातत्याने हा भाग खाली खचत आहे.

संपर्क तुटण्याची भीती

पाऊस सुरू झाल्याने या भागात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. अशातच जर पूल कोसळला तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच एकमेव रस्ता असल्याने पानशेत परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे.

PWD
Pune: सिंहगड रोडवर 'या' वाहनांना बंदी घालाच? कोणी केली मागणी...

अजून मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु, मोठा पाऊस झाल्यास पूल कोसळणार हे नक्की आहे. प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे.

- सूरज पवळे, उपसरपंच, सोनापूर

एकमेव रस्ता असल्याने पूल कोसळल्यानंतर परिसरातील गावांचा संपर्क तुटणार आहे. प्रशासनाने पर्यायी रस्त्याबाबत अगोदरच तजवीज करायला हवी. तसेच शक्य तेवढे लवकर काम सुरू करायला हवे.

- प्रमोद लोहकरे, माजी सरपंच, ओसाडे

टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वर्क ऑर्डर झाल्यानंतर लगेच कामाला सुरवात करण्यात येणार आहे. सातत्याने पुलाच्या स्थितीचा आढावा घेण्यात येत असून, सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. दुर्घटना होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

- अमोल पवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, पुणे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com