अजित पवार अर्थमंत्री होताच पुणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, काय?..

Ajit Pawar
Ajit PawarTendernama

पुणे (Pune) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी पहिली आनंदाची बातमी आली आहे. अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडली असून तालुक्यातील जलसंधारणाच्या ५० कोटीच्या विकासकामावरील स्थगिती उठवली आहे. तालुक्यातील जलसंधारणाची कामे मार्गी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatraya Bharne) यांनी दिली.

Ajit Pawar
अमरावतीतील 'PM  मित्रा’ पार्कच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रोजगार

इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असताना इंदापूर तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला होता. जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री असताना त्यांनी तालुक्यातील ६५ ठिकाणी साठवण बंधारे बांधणे व पाच ठिकाणी रूपांतरित साठवण तलाव करण्यासाठी सुमारे ५० कोटींचा निधी मंजूर केला होता. यांच्या कामांचे टेंडरही काढले होते. मात्र, राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर ५० कोटी रुपयांच्या कामांना नवीन सरकारने स्थगिती दिल्यामुळे कामे रखडली होती.

Ajit Pawar
Pune: पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी गुड न्यूज; वाळू खरेदीसाठी...

जलसंधारणाची कामे रखडल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा होणार होता. गेल्या पंधरवड्यामध्ये राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार झाल्यानंतर माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भरणे यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे मदनवाडी, पिंपळे, कळस, कचरेवाडी, गोखळी, गलांडवाडी, गोतोंडी, तरंगवाडी, निमगाव केतकी, कालठन नं १, रेडा, खोरोची, रेडणी, निमसाखर, रणगाव, निंबोडी, बोरी, काझड, चाकाटी, बोराटवाडी, बावडा, कळंब, भांडगाव, काटी, कौठली, पिटकेश्र्वर, शिरसटवाडी, दगडवाडी, सराफवाडी, कडबनवाडी, व्याहळी, काळेवाडी, भावडी, शेटफळगडे व न्हावी या गावामधील जलसंधारणाची कामे मार्गी लागणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com