पुणे (Pune) : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे गुरुवारी मोठ्या प्रमाणात ‘पीएमपी’ची सेवा प्रभावित होणार आहे. शहरातील १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याने मध्य पुण्यात ‘पीएमपी’ला ब्रेक लागणार आहे. सकाळी व दुपारच्या सत्रात फेऱ्या कमी होतील. मात्र रात्री विशेषतः उपनगरासाठी फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे उपनगरात परतणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातील वाहतुकीत बदल केला आहे. छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता आदींसह एकूण १७ रस्ते मिरवणुकीसाठी बंद केले जाणार आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ला मध्य पुण्यात नो एन्ट्री असणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी व दुपारच्या सत्रातील बस फेऱ्या विस्कळित होणार आहेत.
या ठिकाणांसाठी बस सुटणार
- स्वारगेट बस स्थानक : कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, नऱ्हे, आंबेगाव, जांभूळवाडी, अप्पर इंदिरानगर, मार्केटयार्ड, सांगवी, आळंदी.
- नटराज हॉटेल/सिंहगड रस्ता : वडगाव, धायरी व गरजेनुसार सिंहगड, खानापूर.
- स्वारगेट डेपो : हडपसर, कोंढवा हॉस्पिटल.
- महात्मा गांधी स्थानक (पुलगेट) : कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, साळुंके विहार.
- हडपसर गाडीतळ : स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, उरुळी कांचन, मांजरी, थेऊर, फुरसुंगी, देवाची उरुळी.
- मोलेदिना हॉल : विश्रांतवाडी, लोहगाव, वाघोली, विमाननगर, वडगाव शेरी, आळंदी.
- डेंगळेपूल : लोहगाव, वडगावशेरी, मुंढवा गाव/केशवनगर, शुभम सोसायटी, आनंद पार्क, तळेगाव ढमढेरे, हडपसर.
-महापालिका : भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देहूगाव, विश्रांतवाडी, पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे गाव, तळेगाव दाभाडे, सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी रेल्वे स्टेशन.
- काँग्रेस भवन : कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, कोथरूड डेपो.
-डेक्कन जिमखाना : कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, गोखले नगर, कोथरूड डेपो.
- कात्रज डेपो : स्वारगेट
- महापालिका थांबा : बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सूसगाव.
- अप्पर डेपो बस स्थानक : स्वारगेट
- धनकवडी बस थांबा : स्वारगेट
- निगडी बस स्थानक : मनपा भवन
- भोसरी बस स्थानक : मनपा भवन
- चिंचवडगाव बस स्थानक : मनपा भवन
- पिंपरी मेट्रो स्टेशन : चिंचवड, डांगे चौक, निगडी, पिंपरी, काळेवाडी, चिखली.