Pune : Good News! पुणे विमानतळावरील विमान उड्डाणांची संख्या वाढणार; कारण...

विस्तारीकरणामुळे उड्डाण क्षमतेत वाढ; प्रतीक्षा उद्‌घाटनाची
Pune Airport
Pune AirportTendernama

पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या (Pune Airport) विस्तारीकरणाचा प्रकल्प पूर्ण झाला असून, आता उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे अल्पावधीत उद्‍घाटन होईल, असे सुमारे १५ दिवसांपूर्वी पुण्यात सांगितले होते. मात्र, त्याबाबत अद्याप कुठलिही अधिकृत घोषणा झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याची चर्चा आहे.

Pune Airport
Mumbai : अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट बरोबर राज्य सरकारने का केले करार?

पुणे (लोहगाव) विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पास २०१७ मध्ये प्रारंभ झाला. आता त्याचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ४७६ कोटी रुपये खर्च केले आहेत. उद्‍घाटनानंतर विमानतळावरील एकूण चेक इन काऊंटर्स ३४ होणार आहेत. तर, पाच एरोब्रिज होतील. तसेच प्रति तास सुमारे २३०० प्रवासी विमानतळावरील सुविधांचा वापर करू शकतील, अशा पद्धतीने विस्तारीकरणाचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

विमानतळावरून सध्या दररोज ९० विमानांची उड्डाणे होतात, तर सुमारे २२ हजार प्रवाशांची वाहतूक होते. उद्‍घाटनानंतर विमानांच्या उड्डाणांची क्षमता ३० ने वाढेल तर, प्रवासी संख्याही १० हजारने वाढेल, असा विमानतळ प्रशासनाचा विश्वास आहे.

Pune Airport
Nagpur : 'या' घोटाळ्यात एनआयटीचे अनेक अधिकारी सहभागी होण्याची शंका?

लहूजी वस्ताद स्मारकाचे भूमिपूजन?

क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे यांचे राज्यातील भव्य स्मारक पुण्यातील संगमवाडी येथे होणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुमारे ७२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. स्मारकाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने १६१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या स्मारकात शैक्षणिक, आरोग्य, उद्योग-व्यवसाय आदींशी संबंधित प्रकल्प असतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, पोलिस आणि लष्करातील भरतीचे येथे प्रशिक्षण मिळेल. तसेच सुमारे ३५० मुले आणि ३५० मुलींचे वसतीगृह येथे होईल.

स्मारकाच्या आराखड्याबाबतचे टेंडरही प्रसिद्ध झाले आहे. आता केव्हाही भूमिपूजन शक्य आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि मातंग समाजातील ज्येष्‍ठ कार्यकर्ते अशोक लोखंडे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com