Pune : आधी गैरव्यवहारांचे आरोप अन् नंतर बनले सख्खे मित्र! आता पुढे काय?

Devednra Fadnavis, Ajit Pawar
Devednra Fadnavis, Ajit PawarTendernama

पुणे (Pune) : केंद्र सरकारशी संबंधित रेडझोनचा (Read Zone) प्रश्न असेल अथवा राज्य सरकार व महापालिकेशी संबंधित भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पातील जॅकवेलचे टेंडर, मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंग व आगीच्या घटना; २०१७ ते २०२२ या पाच वर्षात महापालिकेच्या माध्यमातून भाजपने (BJP) घेतलेले निर्णय, याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) वेळोवेळी गैरव्यवहाराचे आरोप केले. मात्र, गेल्या महिन्यात एक जुलै रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपशी घरोबा करत सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून राष्ट्रवादीने आरोपांची ‘तलवार म्यान’ केली आहे. गेल्या पावणेदोन महिन्यात भाजप विरोधात चकार शब्दही काढलेला नाही.

Devednra Fadnavis, Ajit Pawar
Ajit Pawar : पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत अजितदादांनी दिली Good News!

महापालिकेत २००२ पर्यंत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकत्रित सत्ता होती. कॉंग्रेसचे दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर २००३ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १२८ पैकी ७७ जागा जिंकून महापालिका ताब्यात घेतली. अर्थात त्याला पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये लागलेली हजेरीचे कारण होते. २०१७ ते २०२२ या पाच वर्षात भाजपने घेतलेल्या बहुतांश निर्णयांवर राष्ट्रवादीने आक्षेप घेतले.

माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे व विद्यमान अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपला विरोध करण्याची एकही संधी महायुतीत जाण्यापूर्वी सोडली नाही. मात्र, गेल्या एक जुलै रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजप-शिवसेनेच्या (शिंदे गट) सरकारमध्ये सहभागी झाले. शहर राष्ट्रवादीचे तत्कालीन बहुतांश पदाधिकाऱ्यांनीही अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले. तेव्हापासून राष्ट्रवादीच्या अजित पवार समर्थक पदाधिकाऱ्यांनी भाजप विरोधात चकार शब्दही काढलेला नाही.

Devednra Fadnavis, Ajit Pawar
Nashik : मनमाडच्या एमआयडीसीसाठी होणार 177 हेक्टर भूसंपादन

राष्ट्रवादीचे भाजपवरील आरोप

- दिघी-भोसरी मॅगझीन रेडझोन हद्द कमी करण्याचे सत्ताधारी भाजपचे आश्वासन हवेतच विरले. रावेत, किवळे, मामुर्डी आणि संपूर्ण निगडी प्राधिकरणावर ‘रेडझोन’ची टांगती तलवार आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करायची आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची हा भाजपचा धंदा झाला आहे.

- भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधावयाच्या जॅकवेल टेंडर प्रकरणातील ठेकेदार कंपनी ब्लॅकलिस्टेड असतानाही काम दिले. भाजपच्या पाठिंब्याने जॅकवेलच्या कामात ३० कोटी रुपयांची लूट होत आहे. महापालिका कारवाई करण्याच्या मनस्थिती नसल्याने नवीन गैरव्यवहार समोर आणला आहे. याबाबत राष्ट्रवादीने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

- मेकॅनिकल कम्पोस्टिंग, सॅनिटरी लॅन्डफिल, प्लास्टिक टू फ्युएल प्लान्ट, वर्मी कम्पोस्टिंग प्लान्ट, प्लास्टिक वेस्ट टू ग्रॅन्युएल्स, वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पातील ठेकेदारांना वाचविण्यासाठी आणि त्यांच्या संगनमताने झालेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी मोशी कचरा डेपोला आग लावल्याचा संशय व्यक्त केला होता.

Devednra Fadnavis, Ajit Pawar
Nashik : आयटी पार्कची जागा बदलून उद्योगमंत्री सामंतांची राजकीय फोडणी

कोणती रणनीती आखणार?

अजित पवार यांनी १९९१ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीपासूनच पिंपरी चिंचवड शहरावर विशेष लक्ष दिले आहे. या शहराच्या विकासातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु; राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपवरील या आरोपांच्या आधारेच आगामी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजपला घेरणार होती. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजित पवार गट) आपली रणनीती बदलावी लागणार असल्याचे चित्र आहे.

नवीन कुठले मुद्दे घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार हा आता उत्सुकतेचा विषय आहे. तर हेच मुद्दे घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी आगामी महापालिका निवडणुकीत उपस्थित करू शकते. परंतु; महाविकास आघाडीकडे सक्षम नेतृत्वाचा अभाव सध्या तरी दिसत आहे.

Devednra Fadnavis, Ajit Pawar
Pune : महानगरपालिकेने 'करून' दाखविले! पुणेकर झाले खुश!

भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल टेंडर प्रकरण सध्या उच्च न्यायालयात आहे. मोशी कचरा डेपोला लागलेल्या आग प्रकरणाची चौकशी झाली आहे. त्यात ठेकेदार दोषी आढळला असून, महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.

- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com