Property Tax
Property TaxTendernama

Pune : अखेर पालिकेकडून पहिल्या 100 थकबाकीदारांची यादी जाहीर

Published on

पुणे (Pune) : मिळकतकर विभागाकडून थकबाकी वसूल करताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केल्यानंतर मंगळवारी (ता. ४) प्रशासनाने शहरातील पहिल्या १०० थकबाकीदारांची यादी जाहीर केली केली आहे. या थकबाकीदारांनी ३३४.१० कोटी रुपये थकविले आहेत. यामध्ये सर्वात मोठ्या थकबाकीदाराची रक्कम ही १८ कोटी ४४ लाख रुपये इतकी आहे.

Property Tax
Pimpri : चिंचवडगाव-थेरगावला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण पण ठेकेदाराने...

पुणे महापालिकेने उत्पन्न वाढविण्यासाठी मिळकतकर विभागाला विशेष मोहित हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार थकबाकीदारांच्या मिळकतीसमोर बँड वाजविणे, मिळकत जप्त करणे, टाळे ठोकणे अशी कारवाई केली जात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून ही कारवाई सुरू असल्याने थकबाकीदारांमध्ये प्रशासनाबाबत धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान, मिळकतकर विभागाने पेठनिहाय निरीक्षकांना वसुलीचे लक्ष्य दिले असून, ते रोज ३०० मिळकतींना भेटी देत आहेत.

Property Tax
MSIDCद्वारे राज्यात 6 हजार किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटची कामे; 37000 कोटींचे बजेट

मिळकतकर विभागाकडून छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप होत आहे. त्यानंतर आज शहरातील सर्वात जास्त थकबाकीदार असणाऱ्या १०० थकबाकीदारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये १८ कोटी ४४ लाखाचा पहिला थकबाकीदार असून, सर्वात शेवटचा थकबाकीदार हा १ कोटी ३६ लाख रुपयांचा आहे. त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

Property Tax
Mumbai : बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने दिली Good News; आता कोठूनही...

शासकीय संस्थांची थकबाकी

महापालिका प्रशासनाने शासकीय संस्थांच्या थकबाकीची रक्कम व यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात जास्त थकबाकी ही आयसर या संस्थेची २३ कोटी २१ लाख रुपये इतकी आहे. या यादीत राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अखत्यारितील ४३८ संस्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये १० मिळकतींची थकबाकी ही एक हजारपेक्षा कमी आहे.

Tendernama
www.tendernama.com