Pune: तब्बल 18 हजार पुणेकरांचे वीजबिल शून्यावर

MSEB, Mahavitaran
MSEB, MahavitaranTendernama
Published on

पुणे (Pune): वीजबिल वाढविण्यापेक्षा घराच्या छतावर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर प्रकल्प उभारून वीजबिल शून्य करण्याचा पर्याय १८ हजार ६९४ पुणेकरांनी निवडला आहे. या योजनेतून त्यांना १५१ कोटींचे अनुदान मिळाले असून, ९०.६२ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होत आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

MSEB, Mahavitaran
विरार-अलिबाग प्रवास होणार सुपरफास्ट! 3 महिन्यांत...

घरगुती वीज ग्राहकांना त्यांच्या दरमहाच्या वीजबिलापासून मुक्तता देण्यासाठी तसेच त्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने सूर्यघर योजनेची सुरुवात केली आहे. देशभरात या योजनेतून ५ हजार ८८९ मेगावॉट इतकी क्षमता विकसित झाली आहे, तर महाराष्ट्रात २ लाख ९१ हजार ८११ घरांवर प्रकल्प उभारले असून, त्याची क्षमता ११०० मेगावॉटवर पोहोचली आहे.

पुणे परिमंडलातही या योजनेचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ३१ हजार ६४९ घरगुती ग्राहकांनी सूर्यघरसाठी नोंदणी केली असून, पैकी १८ हजार ६९४ घरांवर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून ९०.६२ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे, तर ७ हजार ३९७ प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. तेदेखील लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे.

MSEB, Mahavitaran
पश्चिम, मध्य अन् हार्बर रेल्वेमार्ग जोडणार! पनवेलवरून थेट बोरिवली, वसईला जाता येणार

असा घ्या लाभ

ज्या ग्राहकांचा वीजवापर ३०० युनिटच्या घरात आहे, त्यांच्यासाठी ३ किलोवॉट क्षमतेचा सूर्यघर प्रकल्प पुरेसा आहे. यातून साधारणपणे ३०० ते ३६० युनिट वीज महिन्याला तयार होते. पहिल्या दोन किलोवॉटपर्यंत प्रतिकिलोवॉट ३० हजार रुपये, तर ३ किलोवॉट प्रकल्पाला ७८ हजारांचे अनुदान केंद्र सरकारकडून मिळते.

गृहनिर्माण संस्थांना या योजनेतून प्रतिकिलोवॉट १८ हजार रुपये प्रमाणे ५०० किलावॉट क्षमतेपर्यंतचे अनुदान दिले जाते. त्यामुळे ज्यांना प्रकल्प बसविण्याची इच्छा आहे. परंतु, आर्थिक नियोजनामुळे शक्य होत नाही. अशांसाठी केंद्रसरकारने ‘जनसमर्थ’ पोर्टल विकसित केले आहे. सूर्यघर प्रकल्पाची नोंदणी महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या पोर्टलवर केल्यानंतर https://www.jansamarth.in/register पोर्टलवर कर्जाची मागणी करता येते.

MSEB, Mahavitaran
Chakan: टेंडरवरून नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरच ठेकेदारांचा राडा

नामांकित राष्ट्रीय बँका ‘जनसमर्थ पोर्टल’द्वारे ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देतात. विशेष म्हणजे याचा व्याजदर गृहकर्जापेक्षाही कमी आहे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

पुणेकर सूर्यघर योजनेचे महत्त्व जाणतात. त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून या योजनेत सहभागी व्हावे. महावितरणने ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. अनुदानही तातडीने प्राप्त होते. तसेच यासाठी लागणारे वीजमीटरसुद्धा महावितरणने मोफत दिले आहेत.

- सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com