.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : मंगळवार पेठेतील सव्वादोन एकर जागा कर्करोग रुग्णालयासाठी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी MSRDC) ही जागा बांधकाम व्यावसायिकाला (Builder) कवडीमोल भावाने ९० वर्षासाठी देण्यासाठी टेंडर (Tender) काढले आहे, हे टेंडर रद्द करावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी खासदार व अर्बन सेलच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी दिला आहे.
समाजामध्ये कर्करोगाचे रुग्ण वाढत असताना त्यावर उत्तम उपचार मिळणाऱ्या रुग्णालयांची गरज आहे. काही वर्षांपूर्वी मंगळवार पेठेत ससून रुग्णालयाच्या परिसरात असणारी सव्वा दोन एकर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने एमएसआरडीसीला दिली. या जागेवर कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव तयार असून तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी आहे, असे असताना एमएसआरडीसीने हा भूखंड बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शहरात कर्करोग रुग्णांना आयसीयू उपलब्ध होत नाहीत. डब्ल्यूएचओने भारतातील कर्करोगाचे प्रमाण १० व्यक्तीमागे १ असेल अशी शक्यता वर्तवली आहे, असे असताना हा भूखंड बांधकाम व्यावसायिकाला देणे अयोग्य असून, हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.