Pune : पुणे-मिरज लोहमार्गावरील उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट

Bridge
BridgeTendernama

पुणे (Pune) : घोरपडी येथे पुणे-मिरज लोहमार्गाच्यावर उड्डाणपूल (रेल्वे ओव्हर ब्रीज - ROB) बांधण्यासाठी लष्कराकडून भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबद्दल महापालिकेकडून लष्कराला क्वार्टर बांधून देणे, सेवावाहिन्यांची व्यवस्था करणे यासह रोख मोबदला देण्यात येईल. या कामासाठी सध्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यापुर्वी ठेकेदारला कार्यादेश दिले जातील, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Bridge
Nashik : झिरवळ यांनी का बोलावली मंगळवारी मंत्रालयात बैठक? काय आहे तक्रार?

पुणे-मिरज लोहमार्गावरील ‘आरओबी’साठी नुकतीच लष्कराचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये या प्रकल्पासंदर्भात आढावा घेतला गेला. हा रेल्वे पूल बांधताना यामध्ये पुणे कँटोन्मेंट, रेल्वे विभाग यांची जागा आवश्‍यक आहे. संरक्षण विभागाने २०१६ मध्येच कँटोन्मेंटची ४ हजार ५६० चौरस मीटर जागा हस्तांतरित करण्यासाठी परवानगी दिलेली आहे.

Bridge
PWD : संपाच्या इशाऱ्यानंतर ठेकेदारांच्या देयकांसाठी 1200 कोटी मंजूर?

दरम्यान, यापूर्वी पुणे-सोलापूर लोहमार्गावरील पुलाचे काम महापालिकेने सुरू केले असून, त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता पुणे-मिरज लोहमार्गावरील पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या कामासाठी टेंडर काढण्यात आली असून, महापालिकेने या कामाचा खर्च ४८ कोटी रुपये इतका निश्‍चित केला आहे. फेब्रुवारीपर्यंत या कामाच्या ठेकेदाराची निवड करून कार्यारंभ करण्याचे आदेश दिले जातील. या रेल्वेपुलाची एकूण लांबी ६३६ मीटर इतकी असून रुंदी साडेदहा मीटर असेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com