Pune: पुणेकरांचे कंबरडे मोडले; पालिकेच्या निकृष्ट कामांची पोलखोल

Pune (File)
Pune (File)Tendernama

पुणे (Pune) : पुणे शहरात (Pune City) झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानेच रस्त्यांची चाळण झाली असून, महापालिकेच्या निकृष्ट कामांची पोलखोल झाली आहे. खड्ड्यांमध्ये आदळून कंबरडे मोडण्याची वेळ आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

Pune (File)
UAE सरकारचा नाशिक विमानतळाबाबत महत्त्वाचा निर्णय; आता...

महापालिकेकडून जल, सांडपाणी व विद्युत वाहिनीसह मोबाईल केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. पावसाळ्यामुळे हे काम चार महिने थांबविले आहे. मात्र, मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील प्रमुख रस्ते व गल्लीबोळात डागडुजी केलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडू लागले आहेत.

कोणत्या भागात खड्डे?

मध्यवर्ती पेठांमध्ये मोमीनपुरा गंजपेठ, सदाशिव पेठ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ, शिवाजी रस्ता मामलेदार कचेरी, महात्मा फुले पेठ, शनिवार पेठ, नवी पेठ, रजपूत वस्ती ते भिडे पूल नदी काठचा रस्ता, गणेश खिंड रस्ता, भाऊ पाटील रस्ता, रविवार पेठ, टिंबर मार्केट, पद्मावती परिसरात खड्डे पडले आहेत. धनकवडी, आंबेगाव पठार येथील निम्मा रस्ता सिमेंटचा तर निम्मा डांबरी आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गतिरोधकावरही खड्डे पडले आहेत.

Pune (File)
अखेर निधी मिळाला; नाशिकच्या आमदारांना पुरवणी मागण्यांमधून 850 कोटी

सिंहगड रस्त्यावर कोंडी

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असून तेथेही खड्डे पडले होते. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ववत करावा, यासाठी पाठपुरावा केला जात असला तरी माणिकबागेतील रस्त्यावर डांबरीकरण केले. मात्र, त्यावरही शेकडो खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे इमानदार व संतोष हॉल चौकातही मोठे खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

आठ दिवसांत दुरुस्ती होणार का?

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी पथ विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन खड्डे का बुजविले जात नाहीत, असा प्रश्‍न करत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ‘आठ दिवसांत शहरातील खड्डे बुजवून रस्ते चांगले करा’, असा आदेश दिला आहे.

Pune (File)
आश्चर्य! नाशिक जिल्ह्यात बनतोय अतिपावसामुळेही न खचणारा पहिला रस्ता

रास्ता पेठेत दारुवाला पुलासह इतर भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकांचे अपघात झाले आहेत.

ॲड. अमित राठी, रास्ता पेठ

सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळील रस्त्यावरील खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहन चालविताना अंदाज न आल्याने माझी दुचाकी खड्ड्यात गेली. खाली पडल्याने माझ्या पायाला व कंबरेला दुखापत झाली.

संतोष शिंदे, धनकवडी

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे स्वतंत्र टेंडर काढले आहे. तसेच, १५ वाहनांद्वारे खड्डे बुजवून चेंबर दुरुस्ती करणार आहोत. १ जून ते २० जुलैपर्यंत ३,८०० खड्डे बुजविले आहेत. पॅचवर्कसाठी २६ हजार टन डांबर व तीन हजार बॅग कोल्डमिक्स डांबर वापरले आहे. पावसाने उघडीप देताच काम सुरू करत आहेत.

व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com