Pune
PuneTendernama

Pune : तब्बल सव्वा सहा लाख पुणेकर पीएनजीच्या प्रेमात? काय आहे प्रकरण?

Published on

पुणे (Pune) : सातत्याने गॅसचा पुरवठा, सिलिंडरच्या तुलनेत स्वस्त पर्याय आणि पुरवठा सुरळीत राहण्यासाठी कोणतीही प्रक्रिया करावी लागत नसल्याने पाइप नॅचरल गॅसचा (पीएनजी - PNG) वापर करण्यास पुणेकरांची पसंती मिळत आहे. त्यामुळे शहरात पीएनजी वापरणाऱ्यांची संख्या सव्वासहा लाखांच्या पुढे गेली आहे.

Pune
Nashik : स्वखर्चाने गाळ खोदून वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा नवा निर्णय

एक लाख चार हजार घरांमध्ये २०२२-२३ मध्ये पीएनजीची जोडणी झाली होती. तर २०२३-२४ मध्ये हा आकडा एक लाख २० हजार झाला आहे. एवढेच नव्हे तर सीएनजी वाहनांचा देखील इंधनाचा वापर वाढला आहे. घरात आणि वाहनांचा ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (एमएनजीएल) कडून गॅस पुरवठा करण्यात येत आहे.

यामुळे वाढतोय पीएनजीचा वापर

- अखंडित गॅसपुरवठा

- सिलिंडर नोंदणीची प्रक्रिया करावी लागत नाही

- डिलिव्हरीमनची वाट पाहावी लागत नाही

- सिलिंडर गॅसच्या तुलनेत स्वस्त

- पर्यावरणास अनुकूल आणि वापरण्यास सुरक्षित

- जितका वापर, तेवढेच बिल (दर दोन महिन्यांनी)

Pune
Nashik : नाशिक जिल्ह्यातील 1389 ग्रामपंचायतींनी केली 86 कोटींची घरपट्टी वसुली

पीएनजीच्या दरात झालेले बदल (प्रति मानक घनमीटरमध्ये)

- ७ एप्रिल २०२३ पर्यंत- ५७ रुपये

- १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत- ५१.३० रुपये

- सध्या असलेले दर- ४९.९० रुपये

आर्थिक वर्ष - नव्याने झालेली पीएनजी जोडणी

२०१८-१९ : ६६,०००

२०१९-२० : १,०५,०००

२०२०-२१ : ८३,०००

२०२१-२२ : ५२,०००

२०२२-२३ : १,०४,०००

२०२३-२४ : १,२०,०००

एमएनजीएलचा पुरवठा

घरे- ६,२५,००० हून अधिक

वाहने- ४,४०,००द हून अधिक

उद्योग- ७८० हून अधिक

Pune
Pune : 'त्या' डबल डेकर फ्लायओव्हरचे काम अखेर सुरू

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएनजी नेटवर्कमध्ये मोठी वाढ होत आहे. २०२३-२४ मध्ये एमएनजीएलने एक लाख २० हजारांहून अधिक कुटुंबांना पीएनजी पुरवला आहे. हे प्रमाण देशातील नॉन-मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक आहे. स्थिर किंमत, पायाभूत सुविधांमुळे पीएनजीच्या वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे. गॅसिफाइड सोसायट्यांतही पीएनजीचा वापर वाढविण्यावर भर देणार आहोत.

- संजय शर्मा, संचालक (व्यावसायिक), एमएनजीएल

अपवादात्मक घटना वगळता आमच्यासाठी सातत्याने पीएनजीचा पुरवठा होत आहे. आम्हाला सिलिंडरच्या तुलनेत हा गॅस वापरणे परवडते. मुख्य म्हणजे सिलिंडर बुक करणे आणि टाकी येण्याची वाट पाहणे हा प्रकार पाइप गॅसच्या जोडणीनंतर थांबला आहे. गॅसचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे आणखी दिलासा मिळाला आहे.

- रुपाली सारखे, पीएनजी वापरकर्ते

Tendernama
www.tendernama.com