Pune : पुणे विमानतळाचा समर शेड्यूल प्रवाशांसाठी कोरडाच, कारण...

Pune Airport
Pune AirportTendernama

पुणे (Pune) : पुणे विमानतळाचे समर शेड्यूल (Pune Airport Summer Schedule) रविवारपासून (ता. २६) सुरू होत आहे. यात मुंबई व वाराणसी या दोन शहरांसाठी नवीन उड्डाण होत आहे. पुणे शहराला अन्य शहरांशी जोडणे यंदाच्या शेड्यूलमध्ये फारसे साध्य झाले नाही. विमानतळ प्रशासनाने जास्तीचे स्लॉट उपलब्ध केले खरे मात्र, विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांचा सेवा देण्यास अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला. त्यामुळे आठवड्याला २०८ विमानांची वाहतूक म्हणजेच सुमारे १०४ स्लॉट हे रिकामे राहिले आहेत. त्यामुळे पुणे विमानतळाचा समर शेड्यूल प्रवाशांसाठी कोरडाच जाणार.

Pune Airport
Nagpur : ड्रॅगन पॅलेसबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा; 214 कोटीतून..

पुणे विमानतळाचे समर शेड्यूल गुरुवारी (ता. २३) रात्री जाहीर झाले. २६ मार्च ते २८ ऑक्टोबर हा त्याचा कालावधी आहे. समर शेड्यूलमध्ये हिल स्टेशनला जोडणाऱ्या विमानांसाठी प्रवाशांचा जास्त प्रतिसाद मिळतो. मात्र, पुणे विमानतळाच्या शेड्यूलमध्ये वाराणसी व मुंबई वगळता अन्य नवीन शहरांना जोडणे शक्य झाले नाही.

पुणे विमानतळावरून जास्तीत जास्त विमानांची वाहतूक व्हावी यासाठी पुणे विमानतळ प्रशासनाने प्रयत्न केला. जास्तीचे स्लॉट उपलब्ध केले. मात्र, त्याला विमान कंपन्यांचा प्रतिसाद लाभला नसल्याने आठवड्याला १०४ स्लॉट रिकामे राहिले आहेत, त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

Pune Airport
Mumbai: 2200 कोटींचे 19 STP प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू : CM

सोमवार ते शुक्रवार दरम्यान दररोज २१८ विमानांच्या वाहतुकीला परवानगी मिळाली आहे. परंतु, प्रत्यक्षात १९५ विमानांची वाहतूक होणार आहे. याचा अर्थ दिवसाला नियोजनाच्या तुलनेत २३ विमानांची वाहतूक होणार नाही. पाच दिवसांचा विचार केल्यास ११५ विमानांची वाहतूक होणार नाही. म्हणजेच या पाच दिवसांत सुमारे ५८ स्लॉट रिकामे राहत आहेत. शनिवारी २१८ विमानांच्या वाहतुकीला परवानगी आहे. मात्र, प्रत्यक्षात १६४ विमानांची वाहतूक होणार आहे, तर ५४ विमानांची वाहतूक होणार नाही. म्हणजेच २७ विमानांचे स्लॉट रिकामे राहिलेले आहेत.

रविवारी २४७ विमानांच्या वाहतुकीला परवानगी मिळाली, प्रत्यक्षात २०८ विमानांची वाहतूक होणार आहे. ३९ विमानांचे वाहतूक होणार नाही. म्हणजेच सुमारे २० विमानाचे स्लॉट रिकामे राहिले आहे. सोमवार ते रविवार दरम्यान १०४ स्लॉट रिकामे राहिले आहेत.

Pune Airport
Nashik ZP: निधी वाटपाचा वाद आता थेट विधीमंडळात

पुणे विमानतळाचा समर शेड्यूल रविवारपासून सुरू होत आहे. यंदा मुंबई व वाराणसीसाठी नवीन सेवा सुरू केली आहे. पुणे विमानतळावरून विमानांची जास्त उड्डाणे व्हावीत याकरिता प्रयत्न केले.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ

Pune Airport
Pune: पुणे मेट्रो बिनकामाची..! अजितदादांनी का दिला सरकारला इशारा?

हवाई दलाच्या सरावाच्या व्यस्त वेळापत्रकातून पुणे विमानतळावर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्लॉट उपलब्ध होणे ही चांगली बाब आहे. मात्र, स्लॉट जास्त रिकामे राहिले आहेत. रिकाम्या राहिलेल्या स्लॉटचा उपयोग यापूर्वी बंद झालेल्या व प्रवाशांकडून मोठी मागणी असलेल्या बेळगाव व नाशिक विमानसेवा सुरू करण्यासाठी झाला पाहिजे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com