पुणे (Pune) : पुणे विमानतळावरील (Pune Airport) प्रवेश प्रक्रियेच्या वेळेत आता किमान १५ ते २० मिनिटांची बचत होत आहे. नव्या टर्मिनलवर पुरेशा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. (Pune Airport New Terminal)
‘आयटा’ने (आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना) आखून दिलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत असून निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत प्रवासी बोर्डिंग गेटपर्यंत पोहचत आहेत. डिपार्चर गेट ते बोर्डिंग गेट हा ‘प्रवास’ ३० मिनिटांत होत आहे. यासाठी आधी ५० मिनिटे लागत होती.
विमानतळावर प्रवाशांना कोणत्या प्रक्रियेसाठी किती वेळ लागतो त्यानुसार ‘आयटा’ विमानतळाची क्रमवारी ठरविते. संबंधित प्रक्रियांसाठी लागणाऱ्या वेळेची मर्यादा विमानतळ प्रशासनाला आखून दिली आहे. पुणे विमानतळावर या तुलनेत प्रवाशांना कमी वेळ लागत आहे. पुणे विमानतळावरील सेवेत आता सुधारणा होत असल्याचे हे द्योतक आहे.
प्रक्रिया ः ‘आयटा’ची मर्यादा : पुण्यातील वेळ
डिपार्चर गेट : ५ ः १ ते २
चेक इन काउंटर : २० ः १० ते १२
सिक्युरिटी चेक-इन : १० ः १०
बोर्डिंग गेट : १० ः ४ ते ५
बॅगेज रिक्लेम बेल्ट : १५ ५ ते १०
(सर्व वेळा मिनिटांमध्ये)
...म्हणून वाचतो वेळ
१. नव्या टर्मिनलवर तीन डिपार्चर गेट (जुन्या टर्मिनलमध्ये २)
२. नवीन टर्मिनलचे क्षेत्रफळ तुलनेत जास्त
३. जास्त जागेमुळे प्रवाशांची संख्या वाढली तरी गर्दी होत नाही
४. टर्मिनलमधील प्रक्रिया गतिमान
पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलमध्ये देण्यात येत असलेल्या सुविधांमुळे प्रवाशांना विविध प्रक्रियांसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होत आहे. प्रवाशांना ‘आयटा’ने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा कमी वेळ लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या रांगा, तक्रारींचे प्रमाणही कमी झाले आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे