Thane
Thane Tendernama

Thane : महापालिकेच्या 'त्या' टेंडरकडे ठेकेदारांची पाठ; अटी-शर्थी शिथील करुनही ठेकेदार फिरकेनात

Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या टेंडरला तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. टेंडरमधील अटी शर्थी शिथील करुनही ठेकेदार विकासक पुढे येत नसल्याने महापालिका चिंतेत आहे. ही योजना राबविण्यासाठी पीपीपी मॉडेलवर टेंडर मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Thane
मुंबई-इंदूर नवीन 309 किमी रेल्वे मार्गाला मंजुरी; 18 हजार कोटींचे बजेट

राज्य सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी महापालिका हद्दीत बेतवडे येथे २ भूखंड मिळाले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात आर्थिक दुर्बल घटकांतर्गत सुमारे १,४४१ लाभार्थी आहेत. त्यापैकी १,२५३ लाभार्थ्यांना ही घरे अल्पदरात उपलब्ध होणार आहेत. तर १८८ प्रकल्पबाधितांना दोन लाख इतका आर्थिक हिस्सा देऊन सदनिका उपलब्ध होणार आहेत. या सदनिका ३० चौरस मीटर चटईक्षेत्र क्षेत्रफळाच्या असतील.

Thane
Mumbai : गिरणी कामगारांना सरकारने काय दिली Good News? टेंडरही निघाले; वाचा सविस्तर

महापालिकेने या कामाचे टेंडर पीपीपी तत्त्वावर काढले आहे; परंतु टेंडरला दोनदा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ देताना महापालिकेने काही अटी शिथिल केल्या. त्यानुसार यात केवळ इमारत बांधणारे विकासकच नाही, तर रस्ते व पूल बांधणारे मात्र ज्यांना कामांचा अनुभव असेल, अशांना देखील संधी देण्यात येईल, अशी दुरुस्ती करण्यात आली. तसेच योजनेतून विकसकांना मिळणार नफा १६ टक्के होता, तो नंतर १८ टक्के करण्यात आला. आता महापालिका २० टक्क्यापर्यंत नफा देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे; मात्र इतके करूनही या टेंडरला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.

Tendernama
www.tendernama.com