Pune : कात्रज - कोंढवा रोडवर निष्पापांचे बळी गेल्यानंतर पालिकेला जाग

katraj kondhwa road
katraj kondhwa roadTendernama

पुणे (Pune) : मागील काही दिवसांपासून वाढलेले अपघातांचे सत्र आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार पुणे महापालिकेने (PMC) कात्रज-कोंढवा रस्त्यावर (Katraj - Kondhva Road) उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, उतारावर रम्बलर लावण्याचे काम पथ विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.

katraj kondhwa road
Nashik : पेठरोडच्या काँक्रिटीकरणासाठी महापालिका देणार 45 कोटी

गोकुळनगर चौकात बाजूपट्ट्या मारणे, शत्रुंजय मंदिर चौकात डांबरीकरण, नुकतेच दोन अपघात झालेल्या स्मशानभूमीजवळील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र संपूर्ण खड्डे बुजविण्यासाठी किमान १४०० मेट्रिक टन डांबराची आवश्यकता असताना केवळ ४०० मेट्रिक टनांमध्ये काम करण्यात आले. पावसामुळे डांबर उपलब्ध झाले नाही. रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने त्यातच काम करावे लागले, असे पथ विभागाकडून सांगण्यात आले.

तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी तातडीने भूसंपादन करून संपूर्ण रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी स्थानिक नागरिकांची प्रमुख मागणी आहे. तसेच शत्रुंजय मंदिर चौक ते खडीमशीन चौकापर्यंत पाणीपुरवठा विभागाने खोदाई केल्याने तयार झालेले खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत, याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.

katraj kondhwa road
Pune : रस्त्यातील खड्डे बुजवलेच नाहीत; पुणे महापालिकेची उच्च न्यायालयाकडून खरडपट्टी

येत्या काळात डांबर उपलब्ध झाल्यास आणि पावसाने उघडीप दिल्यास माउलीनगर परिसर तसेच शत्रुंजय ते एसबीआय बँक चौकापर्यंत डांबरीकरण करण्याची योजना आहे. लवकरच रस्ता खड्डेमुक्त होईल आणि अपघातास आळा बसून, नागरिकांना त्रास होणार नाही.

- धनंजय गायकवाड, उपअभियंता, पथ विभाग महापालिका

केवळ डांबरीकरण हा उपाय महत्त्वाचा नाही. तातडीने भूसंपादन करून रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे. महापालिकेने हे काम तातडीने मार्गी लावावे.

- संतोष लोंढे, नागरिक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com