Pune : पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्यांचा वेळ वाचविण्यासाठी प्रशासनाचा नवा प्रस्ताव; हडपसर ते...

Hadapsar Railway Station
Hadapsar Railway StationTendernama
Published on

पुणे, ता. ४ ः हडपसर ते पुणे स्थानकादरम्यान तिसरी मार्गिका टाकण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

Hadapsar Railway Station
MahaRERA : महारेराचा दणका; राज्यातील 'ते' 141 प्रकल्प रद्द होणार?

पुणे स्थानकावर शंटिंगसाठी (रोलिंग स्टॉकच्या वस्तूंचे संपूर्ण गाड्यांमध्ये किंवा रिव्हर्समध्ये वर्गीकरण करण्याची प्रक्रिया) अथवा घोरपडीतील पीटलाइनवर (डब्यांची देखभाल-दुरुस्तीची जागा) गाडी घेऊन जाण्यासाठी सोलापूर किंवा मिरज मार्गिकेचा वापर होतो. शंटिंगवेळी या दोन्ही मार्गिका ब्लॉक होतात. त्यामुळे दौंड किंवा मिरजहून पुणे स्थानकावर दाखल होणाऱ्या प्रवासी गाड्यांना होम सिग्नलवर शंटिंग पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते.

प्रवाशांचा हा वेळ वाचावा म्हणून रेल्वे प्रशासनाने हडपसर ते पुणे स्थानकादरम्यान तिसरी मार्गिका टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. या तिसऱ्या मार्गिकेला घोरपडीतील कोचिंग डेपोला जोडण्यासाठीचाही प्रस्ताव आहे.

असे झाल्यास घोरपडी, पुणे स्थानकावर रेल्वे आणण्यासाठी मिरज व सोलापूरच्या मार्गिकेचा वापर करावा लागणार नाही. तसेच भविष्यात हडपसर स्थानकावरून रेल्वे सुरू करण्यासाठीही तिसरी मार्गिका फायदेशीर ठरणार आहे.

Hadapsar Railway Station
Nashik : पाच कोटींची पाणीचोरी पकडण्यासाठी स्कॉड; दिवाळीनंतर होणार कारवाई

पुणे स्थानकावर दररोज रेल्वे गाड्यांचे व इंजिनचे शंटिंग होते. एका शंटिंगसाठी सुमारे १५ मिनिटांचा वेळ लागतो. याचा परिणाम प्रवासी गाड्यांच्या वेळेवर होतो. शंटिंग सुरू असल्याने व फलाट उपलब्ध नसल्याने दररोज किमान ५० गाड्यांना होम सिग्नलवर १० ते १५ मिनिटे थांबून राहावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो.

हे लक्षात घेऊन रेल्वेच्या परिचालन विभागाने हडपसर ते पुणे दरम्यान तिसऱ्या मार्गिकेचा व कोचिंग डेपो तिसऱ्या मार्गिकेला जोडण्याचा प्रस्ताव विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांच्याकडे दिला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास प्रवाशांची सोय होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com