Pune: पुणे जिल्ह्यातील 'या' रस्त्यांसाठी 91 कोटींची टेंडर्स मंजूर

Amol Kolhe
Amol KolheTendernama

पुणे (Pune) : शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत ९१.५१ कोटींच्या टेंडर्सना (Tenders) ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे (DR. Amol Kolhe) यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

Amol Kolhe
नाशिक-मुंबई वाहतूक कोंडीवर अखेर मुख्यमंत्र्यांचा तोडगा, पाहा काय?

शिरूर-हवेलीसह जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यास सुरवात झाल्याने या रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामांनाही लवकरच सुरवात होणार आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात एकूण सहा रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. त्यानुसार हवेलीतील डोंगरगाव ते वाडेबोल्हाई-गोतेमळा भिवरी ते कोरेगाव मूळ रस्ता, (४.०६ कि.मी. - २.२६ कोटी, रा.मा. ९ सोरतापवाडी- तरडे खालचे ते तरडे वरचे रस्ता (५.०४ कि.मी. - ४.६३ कोटी), राज्यमार्ग ११६ केसनंद ते वाडेगाव-गोतेमळा आष्टापूर हिंगणगाव रस्ता (७.१३ कि.मी. रक्कम ६.११ कोटी) तर शिरूर तालुक्यातील अहमदाबाद ते दुडेवाडी ते निमगाव दुडे ते प्रजिमा ५१ (६.४ कि.मी. रक्कम रु. ४.७८ कोटी), प्रजिमा ५३ कोळगाव डोळस ते प्रजिमा १०० मांडवगण फराटा ते पिंपळसुटी (९.५७ कि.मी. रक्कम रु. १२.४९ कोटी) तसेच रा‌ज्यमार्ग ११८ न्हावरे ते निर्वी धुमाळवस्ती ते कोळपेवस्ती (५.१० कि.मी. रक्कम रु. ६.२२ कोटी) असा एकूण ३६.४९ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Amol Kolhe
Nagpur : जलजीवन मिशन अंतर्गत 25 ठेकेदारांचे रद्द होणार टेंडर

तसेच जुन्नर तालुक्यातील एकूण ४ रस्त्यांसाठी २६.२७ कोटींचा निधी, तर आंबेगाव तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी रुपये २०.६२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. खेड तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी १४.७६ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Amol Kolhe
Nashik विमानतळावरून 6 महिन्यांत तब्बल 90 हजार जणांचा विमानप्रवास

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत कामांच्या मंजुरीसाठी मुळातच बराच काळ लागला होता. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन लवकर कामे सुरू होतील अशी अपेक्षा होती. परंतु ग्रामविकास विभागाकडून या टेंडर्सला मंजुरी मिळण्यास दिरंगाई होत होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेरीस ही मंजुरी मिळून कार्यारंभ आदेश देण्यास सुरवात झाली असल्याने आता लवकर ही कामे सुरू होतील. सर्वच तालुक्यातील रस्ते अतिशय महत्त्वाचे असल्याने ते चांगल्या दर्जाचे व्हावेत, यासाठी बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com