Pune : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 640 किमीचे रस्ते होणार Knit & Clean; काय आहे प्लॅन?

sweeper machine
sweeper machineTendernama

पुणे (Pune) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने (PCMC) केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून यांत्रिकी पद्धतीने शहराची स्वछता करण्यात येणार आहे.

sweeper machine
Pune : 'या' कारणांसाठी देहू-आळंदी-चाकण-राजगुरुनगर नगरपालिका हवीच! काय म्हणाले Ajit Pawar?

भारत सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम अंतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईचा उपक्रम हाती घेतला आहे. सांगवी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते या वाहनांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

यासाठी शहरात दोन विभाग करण्यात आले आहेत. दक्षिण व उत्तर बाजूस प्रत्येकी दोन पॅकेजेसमध्ये हे काम केले जाईल. प्रत्येक पॅकेजमध्ये एकूण अकरा वाहने आहेत. त्यामध्ये हेवी रोड स्वीपर, मीडियम रोड स्वीपर, गोब्लर, हूक लोडर आणि हवा व पाण्याचे टँकरमार्फत रस्ते आणि लिटर पीकर, फुटपाथ आणि पदपथ स्वच्छ केले जाणार आहेत.

sweeper machine
Nashik : संस्कृत विद्यापीठासाठी नाशिकला मिळणार 300 कोटी; जिल्हा प्रशासनाकडून जागेचा शोध

अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यासाठी कर्मचारी यांची नियुक्ती, ऑपरेशन आणि देखभाल कंत्राटदार मार्फत करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाद्‍वारे चाळीस किलोमीटर असे ६४० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात येतील, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

sweeper machine
Nashik : CM शिंदेंच्या मंत्र्यांना फडणवीसांनी का दिला दणका? थेट 'हे' अधिकारच काढले

यांत्रिकी पद्धतीने स्वच्छतेच्या कामामुळे ते गतिमान, निर्दोष आणि प्रभावी होणार आहे. या प्रकल्पामुळे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गुणांकन वाढण्यास मदत होईल. येत्या दोन ते तीन दिवसात हे काम सुरू करण्यात येईल.

- यशवंत डांगे सहायक आयुक्त महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com