Pune: पुणेकरांच्या नशिबी पुन्हा प्रतिक्षाच; 'हा' मुहूर्तही हुकणार!

Metro (File)
Metro (File)Tendernama

पुणे (Pune) : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रोचे (Pune Metro) विस्तारित मार्ग एक मे रोजी सुरू होण्याचा मुहूर्त महामेट्रोला (MahaMetro) गाठता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फुगेवाडी-शिवाजीनगर न्यायालय आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल रुग्णालय दरम्यानचे मार्ग सुरू होण्यासाठी पुणेकरांना आणखी जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल, अशीच चिन्हे आहेत.

Metro (File)
Good News : राज्यात 'या' 40 ठिकाणी अतिरिक्त ई-चार्जिंग स्टेशन

असे आहेत विस्तारित मार्ग
१) फुगेवाडी-शिवाजीनगर न्यायालय ः अंतर ८ किलोमीटर - स्थानके ः बोपोडी, दापोडी, शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय
२) गरवारे महाविद्यालय - रुबी हॉल रुग्णालय - अंतर ७ किलोमीटर - स्थानके ः डेक्कन, संभाजी उद्यान, महापालिका भवन, मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्टेशन आणि रूबी हॉल रुग्णालय

‘सीएमआरएस’ करणार याची पाहणी
- मेट्रो मार्ग, ओव्हरहेड केबल्स, सिग्नल यंत्रणा, मेट्रोच्या डब्यांची देखभाल दुरुस्ती, अग्निशमन यंत्रणा, स्थानके आणि प्रवासी सुरक्षितता

Metro (File)
Nagpur: 'या' देखण्या प्रकल्पाचे उद्या PM मोदींच्या हस्ते लोकार्पण

अशी आहे प्रक्रिया
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महामेट्रोने दोन्ही विस्तारित मार्ग एक मेपर्यंत सुरू होऊ शकतील, असे या पूर्वी म्हटले होते.
- परंतु, कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) यांच्याकडून पिंपरी-शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गाची पाहणी येत्या मंगळवारी (ता. २) होणार आहे.
- त्यासाठी सुमारे ५-६ दिवस लागतील.
- ही तपासणी झाल्यावर गरवारे कॉलेज-रूबी हॉल रुग्णालय मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले असल्यास ‘सीएमआरएस’कडून त्यानंतर त्याची पाहणी होईल.
- दोन्ही मार्गांच्या मेट्रोच्या कामाची पाहणी झाल्यावर ते प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र महामेट्रोला मिळेल.
- त्याची माहिती महामेट्रोकडून राज्य सरकारला कळविण्यात येईल.
- त्यांच्याकडून मंजुरी आल्यावर उद्‍घाटनाची तारीख निश्चित होईल
- त्यानंतर प्रवासी वाहतुकीला मुहूर्त मिळणार आहे.

Metro (File)
Sambhajinagar : विकासगंगा अवतरली; 8 वर्षांनंतर 'या' भागास 231 कोटी

फुगेवाडी-शिवाजीनगर न्यायालय मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे दोन मे रोजी ‘सीएमआरएस’कडून पाहणी होणार आहे. गरवारे कॉलेज-रूबी हॉल रुग्णालय मार्गाची त्यानंतर लगेच पाहणी होऊ शकते. त्यानंतर राज्य सरकारच्या परवानगीने हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी खुले होऊ शकतात.
- हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com