Nagpur: 'या' देखण्या प्रकल्पाचे उद्या PM मोदींच्या हस्ते लोकार्पण

Dr. Ambedkar जयंतीदिनी मुख्यमंत्री करणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन
PM Narendra Modi
PM Narendra ModiTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर (Dr. Babasaheb Ambedkar Convention Center) आणि चिचोली येथील शांतिवन (Shantivan, Chicholi) प्रकल्पाचे काम आता पूर्ण झाले आहे. डॉ. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 13 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चिचोली प्रकल्पाचे ऑनलाइन लोकार्पण करतील. तर जयंतीदिनी, 14 एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते कन्व्हेन्शन सेंटरचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

PM Narendra Modi
MSRDC: मराठवाड्यासाठी गोड बातमी! 'या' 3 प्रकल्पांसाठी TOI प्रसिद्ध

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नागपूरजवळील शांतिवन (चिचोली) येथील बाबासाहेबांच्या स्मृतिसंग्रहालयाच्या पुनर्निर्मितीसाठी केंद्र शासनाने निधी मंजूर केला. या प्रकल्पासाठी 2016 मध्ये मंजूर केलेल्या 17.3 कोटींपैकी नोव्हेंबर 2016 पासून निधी मिळायला सुरवात झाली. शांतिवनमधील संग्रहालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आहेत.

याशिवाय, बाबासाहेबांच्या खासगी आयुष्याशी निगडित जवळपास चारशेहून अधिक वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेला सदरा, कोट, कुर्ते, टाय, मोजे आहेत. यासह वकिली करीत असतानाचा बॅरिस्टर गाउन येथे आहे. त्यांची हस्तलिखित पत्रे, ग्रामोफोन, छडी, टेबल-खुर्ची, पेन, टाइपरायटर अशा वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकल्पातील संशोधन केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. संग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या कामानेही आता वेग घेतला असून, तेही लवकरच पूर्ण होईल, असे एनएमआरडीएकडून सांगण्यात आले.

PM Narendra Modi
संपकरी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही 8 दिवसांचे वेतन? कारण...

उत्तर नागपुरातील कामठी रोडलगत ग्रेन गोडावूनच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'कन्व्हेन्शन सेंटर' उभारण्यात आले आहे. या कन्व्हेन्शन सेंटरमुळे एक चांगले सभागृह तसेच विविध सुविधा असलेले केंद्र उपलब्ध होऊन उत्तर नागपुरात जनतेची सोय होणार आहे. सेंटरची पाचमजली अतिशय देखणी इमारत तयार झाली आहे. यामध्ये बेसमेंट आणि तळमजल्यावर वाहनतळ सुविधा आहे. पहिल्या मजल्यावर भोजन कक्ष, स्वयंपाकघर, व्यापार केंद्र, संमेलन सभागृह, माध्यम केंद्र, बैठक कक्ष, तीन अध्यापन कक्ष, बँक, रोकड खोली, एटीएम, लॉकर कक्ष, व्यवस्थापक कक्ष आहे.

PM Narendra Modi
Nashik : सिन्नर-शिर्डी 45 किमी प्रवासासाठी भरावा लागणार एवढा टोल

दुसऱ्या मजल्यावर फाउंडेशन ऑफिस, बैठक कक्ष, तीन कक्ष, उपाहारगृह आहे. तिसऱ्या मजल्यावर सार्वजनिक ग्रंथालय, ई-ग्रंथालय, बुद्धिस्ट स्टडिज डिव्हीजन, बैठक कक्ष, संचालक कक्ष आहे. तिसऱ्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 40 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. चौथ्या मजल्यावर सभागृह आणि बाल्कनी, प्रकाश कक्ष, ध्वनी कक्ष, रंगभूषा कक्ष, उपाहारगृह, कला दालन, श्रोता दालन, अतिथीगृह, निवास कक्ष आहे. पाचव्या मजल्यावर प्रशिक्षणगृह, नोंदणी कार्यालय, दहा अतिथी कक्ष आहेत.

या प्रकल्पाला सप्टेंबर 2014 रोजी 113.74 कोटी मंजूर झाले. यासह नोव्हेंबर 2022 मध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी 14.94 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. सामाजिक न्याय विभागामार्फत कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले. तर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) त्यांचे बांधकाम केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com