Pune : नितीन गडकरींनी स्वाक्षरी केली अन् शिवनेरी किल्ल्यावरील रोपवेबाबत गुड न्यूज आली!

Amol Kolhe, Nitin Gadkari : शिवनेरीवरील रोपवे प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा
Gadkari
GadkariTendernama

पुणे (Pune) : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या पर्वतमाला योजनेंतर्गत शिवनेरी किल्ल्यावर रोपवे बांधण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ४) सामंजस्य करार (MOU) करण्यात आला.

Gadkari
Nagpur : जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनियमितता; उन्हाळ्यात पाणी मिळेल?

शिवनेरी किल्ल्यावर रोपवे व्हावा यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे सातत्याने मागणी व पाठपुरावा करीत होते. या रोपवेसाठी निधी मंजूर व्हावा यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेटही घेतली होती. त्यावेळी गडकरी यांनी पर्वतमाला योजनेंतर्गत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यास निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना शिवनेरीवरील रोपवेचा प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली होती. त्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला होता.

Gadkari
Dada Bhuse : दादा भुसेंनी आयोजित केलेली 'ती' बैठकच करावी लागली रद्द; नेमके काय झालं?

दरम्यान राज्यात रोपवे बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी शिवनेरी, जेजुरीसह राज्यात १२ ठिकाणी रोपवे बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांकडे १८ जुलै २०२२ रोजी पाठवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी संसद अधिवेशन काळात गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरूच ठेवला होता.

या रोपवेसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत एनएचएलएमएल (NHLML) ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीबरोबर राज्य सरकारचा सामंजस्य करार (MOU) होणे बाकी होते. हा सामंजस्य करार गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे शिवनेरीवर रोपवे बांधण्याच्या दिशेने एक टप्पा पार पडला असे म्हणता येईल.

Gadkari
Nashik : स्मार्टसिटी योजनेतील 60 कोटींच्या सीसीटीव्ही टेंडर घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

या संदर्भात माहिती देताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, हा सामंजस्य करार एक महत्त्वाचा टप्पा आहे. यापूर्वीच एनएचएलएमएलच्या माध्यमातून सल्लागार नियुक्त करण्यात आला होता. परंतु सामंजस्य करार लांबल्याने डीपीआर बनवण्यास विलंब लागत होता. आता सामंजस्य करार झाल्याने सल्लागार संस्था जागेची पाहणी करून डीपीआर तयार करण्याचे काम पूर्ण करेल.

मात्र शिवनेरी किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्यांची आणि वनविभागाची परवानगी, जागा उपलब्ध करून देणे याबाबींची राज्य सरकारने पूर्तता करायची आहे. त्यामुळे आताच रोपवे होणार असे कुणी म्हणत असेल तर तो शिवभक्तांच्या भावनेशी खेळ होईल. त्यापेक्षा छत्रपतींचे कार्य समजून एकोप्याने याचा पाठपुरावा करून शिवनेरी किल्ल्यावर रोपवे लवकर व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करू या, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com