PMRDA : 'त्या' 4 हजार 883 सदनिकांचा जुलैमध्ये मिळणार ताबा

PMRDA
PMRDATendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : अल्‍प दरातील आणि हक्‍काच्या घराचा ताबा नागरिकांना लवकरच मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए PMRDA) वतीने उभारण्यात येणाऱ्या साडेसहा हजार सदनिकांचे सध्या ६५ टक्‍के बांधकाम पूर्ण झाले आहे. जुलै २०२५ मध्ये ते पूर्ण करून नागरिकांना त्यांच्या हक्काचे घरकुल दिले जाणार आहे.

PMRDA
Nashik : आता पाणंद रस्त्यांचा मार्ग होणार मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

‘पीएमआरडीए’च्‍या वतीने सेक्टर १२ येथील पहिल्या टप्प्यातील गृहप्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्‍प्‍यातील गृहप्रकल्‍पाची कामे हाती घेतली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ४ हजार ८८३ सदनिका उभारण्यात आलेल्या होत्या.

ऑनलाइन लॉटरी पद्धतीने येथील सदनिका लाभार्थ्यांना देण्यात आल्‍या. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची गती वाढवण्यात आलेली आहे. यात ४७ इमारतींमध्ये ६ हजार ४५२ सदनिका असतील. अल्‍प, मध्यम व उच्‍च गटातील नागरिकांचा यामध्ये समावेश असणार आहे.

या सदनिकांबरोबरच ८३ व्यावसायिक गाळे बांधले जात आहेत. वन-बीएचके सदनिकेची मागणी अधिकची असल्‍याने तसे बांधकाम केले जात आहे. या प्रकल्‍पासाठी ७३० कोटी रुपये खर्च येणार आहे. २०२३ पासून या कामाला सुरुवात झाली आहे.

PMRDA
Ajit Pawar : ठाणे अन् पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर ग्लास स्कायवॉक होणार; काय म्हणाले अजितदादा?

सेक्‍टर १२ मधील घरांची स्‍थिती...
सदनिका प्रवर्गासह - सदनिकांची संख्या
१) वन-आरके (इडब्‍लूएस-ए) - ३३२
२) वन-बीएचके (इडब्‍लूएस-बी) - ३,३२०
३) टू-बीएचके (एलआयजी-ए) - १,४५६
४) टू-बीएचके (एलआयजी-ए) - १,३४४

तक्रारींनंतर त्रुटी दूर
सेक्‍टर १२ येथील काही सदनिकांबाबत नागरिकांकडून त्रुटी सांगितल्‍या जात होत्‍या. त्‍यावर पाहणी समितीने त्रुटी निश्‍चित केल्‍या आहेत. त्या दूर करण्याच्‍या सूचना आयुक्‍त योगेश म्‍हसे यांनी दिल्‍या होत्‍या. त्‍यानुसार कार्यवाही केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

PMRDA
Ajit Pawar : हेरिटेज दर्जा कायम ठेवून बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमचा पुनर्विकास

सेक्‍टर १२ येथील ४७ इमारतींमधील सहा हजार ४५२ सदनिकांचे काम पूर्ण होण्याच्‍या अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. जुलै २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल, अशी स्‍थिती आहे. काही तांत्रिक अडचण आल्‍यास मुदत पुढे जाईल. त्‍यानंतर नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील.
- संजय पाटील, कार्यकारी अभियंता अभियांत्रिकी विभाग, ‘पीएमआरडीए’

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com