Pune : Good News! पीएमआरडीएच्या 'या' सेवा आता Online

Pune : ‘पीएमआरडीए’ने या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा लाभ नागर‍िकांनी घ्यावा, असे आवाहन ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
pmrda
pmrdaTendernama
Published on

पुणे (Pune) : झोन दाखल्यापासून ते बांधकाम परवानगी देण्यापर्यंतच्या दहा सुविधा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए PMRDA) ऑनलाइन देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

pmrda
पुण्याहून कोल्हापूरला प्रवास करताय? आता 'हा' नवा मार्ग ठरणार सुपरफास्ट

नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अमलात आला आहे. या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन शासकीय सेवा देण्याच्यादृष्टीने शासनाने आदेश दिला आहे.

त्या अनुषंगाने ‘पीएमआरडीए’ने या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा लाभ नागर‍िकांनी घ्यावा, असे आवाहन ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

pmrda
'या' प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड येत्या तीन दशकांमध्ये पुण्याला मागे टाकणार

या ऑनलाइन प्रणालीत अर्जदारांनी अर्जात नमूद केल्यास त्यांना मोबाईल क्रमांकावर अर्ज प्राप्त झाल्याचा संदेश म‍िळेल. यामुळे नागर‍िकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. आपली फाइल कुठल्या टेबलवर पुढील कार्यवाहीसाठी आहे, याची माह‍िती अर्जाबरोबर नमूद केलेल्या क्रमांकावर ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून कळणार आहे.

तसेच या सेवा प्राधिकरणाच्या https://www.pmrda.gov.in या संकेतस्थळावर नागर‍िकांसाठी उपलब्ध केल्या आहेत.

या सेवा ऑनलाइन उपलब्ध :

विकास परवानगी व‍िभाग
१. अभिन्यास/इमारत बांधकाम परवानगी
२. जोते मोजणी प्रमाणपत्र
३. भोगवटा प्रमाणपत्र
४. झोन दाखला
५. भाग नकाशा

pmrda
Mumbai : बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने दिली Good News; आता कोठूनही...

जमीन व मालमत्ता विभाग
१. वाटप भूखंडाचे/गृह योजनेतील सदनिकांचे हस्तांतरण करणे
२. वाटप भूखंडावर/गृह योजनेतील सदनिकांवर वारस नोंद करणे
३. वाटप भूखंडावर/गृह योजना सदनिकांवर कर्जासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे

अग्निशमन विभाग
१. प्राथमिक अग्निशामक ना-हरकत दाखला
२. अंतिम अग्निशामक ना-हरकत दाखला

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com