Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

Eknath Shinde यांना वेळच मिळेना; दीड महिन्यापासून पुणेकर वेटिंगवर

पुणे (Pune) : पुणे महानगर नियोजन समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना वेळ मिळत नसल्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) अर्थसंकल्पाला चालू आर्थिक वर्ष सुरू होऊन दीड महिना होत आला, तरी अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कधी वेळ मिळणार आणि अर्थसंकल्प मंजूर होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Eknath Shinde
Vadodara-JNPT मार्ग प्रगतीपथावर; बेंडशीळ गावाजवळ 4.5 किमी बोगदा

नगररचना योजना (टीपी स्कीम), रस्ते, गृहनिर्माण प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (Metro) प्रकल्प, वर्तुळाकार रस्ता (Ring Road) यासारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आले आहेत. पीएमआरडीएच्या सर्वोच्च समितीचे मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पास मान्यता दिली जाते.

दरवर्षी या समितीची सभा वेळेत होते. यंदा मात्र तीनवेळा या समितीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. प्रत्येकवेळी काही ना काही कारणाने ऐनवेळी ही बैठक रद्द केली जाते. त्यामुळे नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन दीड महिना होत आला, तरीदेखील अर्थसंकल्पाला अद्याप मान्यता मिळू शकलेली नाही.

अर्थसंकल्पास मंजुरी न मिळाल्याने त्याचा परिणाम या प्रकल्पांच्या कामावर होण्याची शक्यता आहे. तसेच पीएमआरडीए क्षेत्रात सुरू असलेल्या पीएमपीच्या सेवेबाबत संचलन तूट देण्याची मागणी पीएमपीने केली आहे.

पीएमआरडीएचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर सादर करायचा आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत अर्थसंकल्पास मान्यता मिळवून पुढील कामे केली जातील.

- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com