Vadodara-JNPT मार्ग प्रगतीपथावर; बेंडशीळ गावाजवळ 4.5 किमी बोगदा

Vadodara-Mumbai Expressway
Vadodara-Mumbai ExpresswayTendernama

मुंबई (Mumbai) : बडोदा-जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या महाराष्ट्रात प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रूंद असा हा आठ पदरी महामार्ग आहे. हा महामार्ग बदलापूरमधून जात असून बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम बेंडशीळ गावाजवळ सुरू आहे. तब्बल साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

Vadodara-Mumbai Expressway
मुंबईतील ब्रिमस्टोवॅडचे नियोजन फेल; खर्च 1200 कोटीवरून 3638 कोटीवर

बडोदा ते जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या महाराष्ट्रात जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रूंद असा हा आठ पदरी महामार्ग असेल. हा रस्ता अंबरनाथ तालुक्यात बदलापूर शहराजवळून जात असून त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.

Vadodara-Mumbai Expressway
BMC : भूमिगत गटारांतील गाळ काढण्यासाठी 107 कोटी; 2 कंपन्यांना कामे

बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आले आहे. तब्बल साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार जानेवारी २०२५ पर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल, तर जून २०२५ पर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्धिष्ट आहे.

Vadodara-Mumbai Expressway
Mumbai : 'या' ठिकाणी होणार नवे कारशेड; 2,352 कोटींचे बजेट

या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज असणार आहे. सोबतच मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गही या महामार्गाला जोडलेले असणार आहेत. त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील प्रवाशांना नवी मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान आठ पदरी महामार्ग उपलब्ध होणार आहे. सोबतच बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार असून पर्यायाने उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com