PMP
PMPTendernama

पुणेकरांचा प्रवास जुनाट बस मधूनच; नव्या बसची अद्याप प्रतिक्षाच

Published on

पुणे (Pune) : पीएमपीत दाखल होणाऱ्या बसचा ‘प्रवास’ लांबला आहे. कारण संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही. केवळ चर्चा झाली आहे. आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत बस खरेदीच्या प्रस्तावावर निर्णय अपेक्षित आहे. आधी लोकसभेच्या आचारसंहितेमुळे उशीर झाला तर आता निर्णयाअभावी उशीर लागणार आहे. एकंदरीतच प्रवाशांचा प्रवास जुनाट बस मधूनच आणखी काही महिने होणार आहे.

PMP
Pune : 'महाज्योती'तील कर्मचाऱ्याशी संबंधित संस्थेलाच दिले कंत्राट? कोणी केली चौकशीची मागणी?

पीएमपीच्या संचालक मंडळाने पूर्वी १०० बस खरेदीला मान्यता दिली होती. यापैकी २० डबलडेकर व ८० बस या १२ मीटर लांबीच्या आहेत. दोन्ही बस वातानुकूलित होत्या. मात्र वातानुकूलित बसची किंमत अधिक होत असल्याने पीएमपी प्रशासनाने नुकताच सुधारित प्रस्ताव सादर केला. यात डबलडेकर व १२ मीटरची बस या विना वातानुकूलित (नॉन एसी) बसचा समावेश आहे. मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नॉन एसी बसचा प्रस्ताव सादर झाला. मात्र, त्यावर अपेक्षित अशी चर्चा झाली नाही. परिणामी निर्णय लांबणीवर पडला आहे.

PMP
Mumbai : समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या 4 हजार कोटींच्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोळ; कोणी केला आरोप?

सीएनजी बससाठी देखील प्रतीक्षा

पीएमपीच्या यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ४०० सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता मिळाली. तर यापूर्वीच १०० स्व मालकीच्या घेण्याबाबतचा निर्णय झाला. दोन्ही मिळून ५०० बस जूनमध्ये प्रवासी सेवेत दाखल होतील असे सांगण्यात येत होते. मात्र, ऑगस्ट सुरू झाला असला तरीही अद्याप सीएनजी बस कधी प्रवासी सेवेत दाखल होतील याचा अंदाज नाही. पीएमपी प्रशासनाने सीएनजी बस खरेदीचा निर्णय घेतला. मात्र, सीएनजीवरील बस उपलब्ध होण्यात देखील अडचणी येत आहे.

बसची संख्या कमी

पीएमपीच्या सातपैकी २ ठेकेदारांची सेवा संपली असल्याने सुमारे २००हून अधिक बस प्रवासी सेवेतून बाद झाल्या आहेत. जून महिन्यात ६० बसचे आयुर्मान संपले आहे. त्यातच रोज किमान २०हून अधिक बसचे ब्रेकडाऊन होत आहे. या सर्वांचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. बसची संख्या मुळात कमी असताना नवीन बसचा मार्ग देखील खडतर ठरत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

Tendernama
www.tendernama.com