खुशखबर! आता मुंबई-पुणे प्रवासात वाचणार 25 मिनिटे; कारण...

Mumbai Pune Expressway
Mumbai Pune ExpresswayTendernama

पुणे (Pune) : या वर्षअखेर मुंबई ही पुण्याच्या आणखी जवळ येणार आहे. कारण पुणे-मुंबईचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून, त्यामुळे वेळेत २५ मिनिटांनी बचत होणार आहे. या दोन्ही शहरातील अंतर कमी करणाऱ्या द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्‍झिट या भागातील पर्यायी रस्त्यासाठी तयार करण्यात येण्यात असलेल्या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम जवळपास सत्तर टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बोगद्यांचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ठेवण्यात आले आहे. (Mumbai - Pune Expressway)

Mumbai Pune Expressway
Good News! राज्यातील या सर्वांत लांब बोगद्याचे काम पूर्ण; लवकरच...

मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरिडॉर देखभाल, दुरुस्तीसाठी बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरित करा) या तत्त्वावर ३० वर्षाच्या कालावधीसाठी राज्य सरकारने १९९९ पासून एमएसआरडीसीकडे हस्तांतरीत केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्‍झिट येथे वेगळे होतात.

अडोशी बोगदा ते खंडाळा एक्‍झिट ही रुंदी सहापदरी असून या भागात १० पदरी वाहतूक येऊन मिळते. तसेच या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यत बंद ठेवावी लागते. या पार्श्‍वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटरच्या राहिलेल्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे.

Mumbai Pune Expressway
'नो पर्चेस डे'मुळे नागपुरात पेट्रोलची काळ्या बाजारात विक्री

नेमके काय होणार?
- या प्रकल्पामुळे बोर घाटातील सहा किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार
- लोणावळापासून सुरू होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्‍झिट इथे संपणार
- प्रकल्पातंर्गत दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम
- पुण्याकडून मुंबईला जाताना असणारा बोगदा सुमारे ९ किलोमीटर लांबीचा
- यातील साडेसहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण
- बोगद्याची रुंदी २३.५ मीटर

Mumbai Pune Expressway
'या' नव्या नियमांमुळे जून महिन्यात तुमच्या खिशाला लागणार कात्री

कमी वेळेचे गणित
- मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक किलोमीटर लांबीचा एक बोगदा आहे
- त्या बोगद्याचे काम पूर्ण
- पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वांत मोठ्या लांबीचा म्हणजे नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा आहे
- त्याचे काम जवळपास ७२ टक्के पूर्ण
- याशिवाय दोन दरीपूल
- मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार
- २५ मिनिटांचा वेळ वाचणार
- डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन

Mumbai Pune Expressway
...अन् पुन्हा इतिहास घडला! 'या' मार्गावर धावली ST ची पहिली E-Bus

कामानिमित्त आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा मुंबईला जावे लागते. खंडळा येथे घाटाचा रस्ता आसल्याने वाहतुकीच्या कोंडीत अडकून राहावे लागते. मिसिंग लिंकचे काम वेळेत पूर्ण झाले, तर मुंबईत वेळेत पोचणे शक्य होणार आहे.
- मिलिंद देशपांडे, प्रवासी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com