MHADA Pune
MHADA PuneTendernama

Mhada Lottery 2023 : पुणे म्हाडाचा दिवाळीत बंपर धमाका! 'त्या' 5,863 घरांच्या लॉटरीच्या सोडतीची तारीख ठरली

पुणे (Pune) : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ५ हजार ८६३ सदनिकांसाठी ‘म्हाडा’कडे (MHADA) ५९ हजार ७६६ इतके अर्ज आले आहेत, अशी माहिती ‘म्हाडा’ पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. दरम्यान, या घरांसाठीची सोडत २४ नोव्हेंबरला काढण्यात येईल.

MHADA Pune
Mhada : म्हाडाचे मोठे दिवाळी गिफ्ट! 'त्या' 38 हजार कुटुंबांना सरसकट मिळणार...

म्हाडा पुणे विभागाने गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील ४३१ सदनिका, १५ टक्के सामाजिक गृहयोजनेतील ३४४ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील २ हजार ४४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २ हजार ४४५ सदनिका अशा एकूण ५ हजार ८६३ सदनिकांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी ५ सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.

MHADA Pune
Nashik : 'या' डबलडेकर पुलाचा आराखडा तयार करा; दादा भुसेंनी प्रशासनाला लावले कामाला!

अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत आहे त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक होते. जेणेकरून छाननीमध्ये अर्ज बाद होणार नाही.

दरम्यान, नागरिकांना प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे अर्ज करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ३१ ऑक्टोबरला संपली. या मुदतीत म्हाडाकडे ७७ हजार २८० जणांनी अर्ज केले. त्यापैकी ५९ हजार ७६६ अर्जदारांनीच अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे अनामत रक्कम भरलेलेच म्हाडाच्या सोडतीसाठी पात्र ठरले आहेत.

MHADA Pune
Nashik : 1384 ग्रामपंचायतींना लॉटरी; जिल्हा परिषद करणार 6.32 कोटी जमा

सोडतीचे वेळापत्रक

- सोडतीसाठी अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध - ८ नोव्हेंबर

- हरकती नोंदणीची मुदत - ११ नोव्हेंबर

- सोडतीसाठी अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध - २० नोव्हेंबर

- सोडत - २४ नोव्हेंबर

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com