पुण्यातील ‘त्या’ 23 गावांच्या विकासासाठी प्रत्येकी 5 कोटी मंजूर

Phursungi, Uruli Devachi
Phursungi, Uruli DevachiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पुण्यातील फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेच्या विकासासाठी आणि पुणे मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकासासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे मनपा हद्दीतील गावांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी या गावातील विविध प्रश्नांचा आढावा घेऊन ते तत्काळ सोडवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

Phursungi, Uruli Devachi
Navi Mumbai: खारघर-नेरूळ कोस्टल रोड आता नवी मुंबई विमानतळाला जोडणार

यावेळी आंबेगाव बुद्रुक येथील कचरा डेपोमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरीक हैराण झाले आहेत. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी या कचरा डेपोचे अभ्यासपूर्ण नियोजन करून त्यानंतरच कचऱ्याची व्हिल्हेवाट लावावी. गांडूळ प्रकल्प राबवून, खड्डा तयार करून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यानंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावावी असे सांगितले. तसेच या कचरा डेपोची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुणे मनपा हद्दीतील ६५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या जांभूळवाडी तलावाच्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून ते आंबेगाव खुर्द आणि बुद्रुक तसेच मांगडेवाडी, भिलारेवाडी, कोळीवाडे, गुजर निंबाळकरवाडी आणि इतर काही गावांना देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी या पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता तपासून त्यानंतर त्यांचा पिण्यासाठी वापर करण्याची प्रकिया सुरू करावी असे निर्देश दिले.

Phursungi, Uruli Devachi
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यावर केंद्राची मोहोर; 3626 कोटी खर्च करुन 4 वर्षात पूर्ण करणार

पुणे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांना आलेला वाढीव कर वसूल करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार या गावांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुणे मनपाने तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, तसेच 23 गावातील थकीत कराची वसूली करण्यासाठी तातडीने अभय योजना राबवावी आणि नगरविकास विभागाच्या सूत्रानुसार कर आकारणी करावी असे निर्देश पुणे मनपा आयुक्तांना दिले. तसेच या 23 गावांचा मनपा हद्दीत समावेश करून घेताना, ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या ६२६ कर्मचाऱ्यांना आकृतिबंधाच्या तांत्रिक अडचणीमुळे सेवेतून कमी करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यासाठी त्यांची सद्यस्थिती तपासून प्राधान्याने सेवेत समाविष्ट करावे असे निर्देश शिंदे यांनी दिले. यावेळी आमदार विजय शिवतारे, खासदार मेधा कुलकर्णी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com