Kharghar
KhargharTendernama

Kharghar : 25 वर्षांत खड्डे न पडलेल्या रस्त्याचे 84 कोटींचे टेंडर नेमके कोणासाठी?

Published on

मुंबई (Mumbai) : खारघर (Kharghar) शहरात गेल्या आठ - दहा वर्षांपासून त्याच रस्त्यावर त्याच ठिकाणी खड्डे (Potholes) पडत असताना, चांगल्या रस्त्यावरच्या कामांसाठी वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. या वर्क ऑर्डर रद्द करून खड्डे पडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची नव्याने वर्क ऑर्डर काढण्याची मागणी खारघर कॉलनी फोरमने केली आहे. यासंदर्भात पनवेल महापालिका (PMC) आयुक्तांना निवेदनही सादर केले.

Kharghar
CM शिंदेंचे आश्वासन हवतेच! स्वातंत्र्य दिन आला तरी विद्यार्थ्यांच्या गणवेशांचा पत्ता नाही

एकविसाव्या शतकातील एक विकसित शहर, अशी संकल्पना घेऊन सिडकोने खारघर वसाहत विकसित केली. या ठिकाणी एज्युकेशन हब, गोल्फ कोर्स, आणि सेंट्रल पार्क सारखे आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहेत. या कॉलनीला वेगळे असे महत्त्व आहे. मात्र पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यापासून खारघर शहर असुविधा आणि समस्यांचे आगार बनले आहे.

दरवर्षी खारघर वसाहतीतील रस्ते खड्ड्यात जातात. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात खड्ड्यांचा 'मायक्रो सर्वे' करण्यात आला. त्यामध्ये दरवर्षी विशिष्ट 20 ते 22 ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचे दिसून आले.

पूर्वी सिडको आणि आता महानगरपालिकेकडून हे खड्डे बुजवले जातात. परंतु या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरणांमध्ये प्रशासनाला रस नाही. त्यामुळे या ठिकाणी 'खड्डे आणि खड्ड्यातील रस्ते'ही समस्या कायम आहे. प्रत्येक वेळी ठेकेदार नियुक्त करून पैसे खर्च केले जातात. यातून मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची उधळपट्टी केली जाते.

Kharghar
आता गावोगावी टोलचे रस्ते?; सहा हजार किलोमीटरच्या 145 रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

ज्या ठिकाणी यापूर्वी चांगले रस्ते होते, खड्डे पडलेले नव्हते, अशा सेंट्रल पार्कचे आजूबाजूचे रस्ते प्रशस्त आणि सुस्थितीत होते, तेथे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. तसेच खारघर ब्रीज ते उत्सव चौक या गेले वीस पंचवीस वर्षे कधीही खड्डे न पडलेल्या रस्त्याचे ८४ कोटी खर्च करून काँक्रिटीकरण करण्याचे टेंडर काढले आहे. विशेष म्हणजे यासाठी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर कुटुंबीयाची 'टीआयपीएल' ही कंपनी नियुक्त करण्यात आली.

महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीच्याआधी खारघरमध्ये शेकडो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे काढण्यात आली. त्यापैकी कोट्यवधी रुपयांची कामे आमदार ठाकूर कुटुंबियांच्या 'टीआयपीएल' कंपनीला देण्यात आली. अवघ्या ४ ते ५ महिन्यापूर्वी या कंपनीकडून करण्यात आलेल्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडले आहेत. खारघर सेक्टर 17 आणि 18 मधील सेलिब्रेशन सोसायटीसमोरील रस्त्याची दुरावस्था निदर्शनास येते. तरी सुद्धा आमदारांच्याच कंपनीला नवी कामे कशी काय मिळतात हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

Kharghar
Tender : राज्य सरकारला दणका! 'तो' निर्णय आला अंगलट; 10 हजार कोटींच्या कामांना न्यायालयाने का दिली स्थगिती?

पनवेल महापालिकेने रस्ते डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाचा प्राधान्यक्रम बदलण्याची आवश्यकता आहे. गरज नसलेल्या ठिकाणी दिलेल्या वर्क ऑर्डर रद्द करून, ज्या ठिकाणी गेली सात-आठ वर्षे सातत्याने खड्डे पडत आहेत, ते रस्ते आणि चौकातील कामे प्राधान्याने करून घ्यावीत. तसेच दर्जेदार कामांसाठी ठेकेदारावर अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे.
- लीना अर्जुन गरड, अध्यक्षा, खारघर कॉलनी फोरम

Tendernama
www.tendernama.com