Old Mumbai-Pune हायवेवरही आता पाळावी लागणार लेनची शिस्त, अन्यथा...

Highway
HighwayTendernama

पुणे (Pune) : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Mumbai - Pune Highway) वेगाने वाहन चालविणे आता वाहन चालकांना महागात पडणार आहे. कारण, ‘एक्स्प्रेस वे’च्या धर्तीवर जुन्या महामार्गावरही इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) बसविण्यात येणार आहे. परिवहन, महामार्ग पोलिस (Highway Police) व MSRDCने त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबतची घोषणा लवकरच होणार असून त्यानंतर सर्व्हेला सुरवात होणार आहे.

Highway
Thane महापालिकेचा ठेकेदारांना दणका; नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी...

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात शनिवारी खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. त्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. वाढत्या अपघातांनंतर प्रशासनाला जाग आली. अनेक वाहन चालक टोलच्या दरात असणाऱ्या फरकामुळे व अन्य कारणांमुळे जुन्या मार्गाचा पर्याय निवडतात. मात्र, हाच पर्याय प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे. त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागापासून ते महामार्ग पोलिसांपर्यंत सर्वच यंत्रणा कामाला लागली असून त्यासाठी जुन्या मार्गावर ‘आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.

द्रुतगती मार्गावर काम सुरु
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहनांनी ठरवून दिलेली मार्गिका सोडू नये यासाठी ‘आयटीएमएस’ ही आधुनिक वाहतूक प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ही प्रणाली कार्यान्वित करणार आहे. यासाठी सुमारे १६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.

Highway
CM: कोल्हापुरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा?

‘आयटीएमएस’ महत्त्वाचे का?
- पुणे-मुंबई द्रुतगतीवर माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर सुरक्षित रस्ते प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
- राज्य सरकारने त्यावेळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’ प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला.
- वाहतुकीची शिस्त पाळली जावी, अपघात टळावे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, तसेच पथकर वसुली जलद, अचूक, तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणार
- या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असल्याने वाहनांवर लक्ष ठेवणे सोपे जाते
- वाहनांचा वेग तपासणारी ‘अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’, तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा शोध घेणारी ‘लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’ असल्याने अपघात कमी होण्यास मदत होते

मार्गावर १४ ब्लॅक स्पॉट
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर व जुन्या पुणे-मुंबई मार्गावर १४ ठिकाणी ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) असल्याचा अहवाल राज्याच्या परिवहन विभागाने दिला आहे. ‘एमएसआरडीसी’कडून काही ब्लॅक स्पॉटवर काही प्रमाणात काम झाले आहे तर काही ठिकाणी काम होणे बाकी आहे.

Highway
Nashik : झेडपीचा अजब कारभार; नगर जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराला...

जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित करावी, असा प्रस्ताव दिला होता. त्यादृष्टीने सकारात्मक हालचाली सुरु झाल्या आहेत. एमएसआरडीसी हे काम करणार आहे.
- विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com